Shraddha Kapoor current Eetha date postpone and new release date announed  Pudhari photo
मनोरंजन

Shraddha Kapoor Eetha new release date announed - श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’ची रिलीज डेट पुढे ढकलली; आता या दिवशी येणार चित्रपट

Shraddha Kapoor Eetha new release date announed - श्रद्धा कपूरच्या ‘ईथा’ची रिलीज डेट पुढे ढकलली; आता या दिवशी येणार चित्रपट

पुढारी वृत्तसेवा

श्रद्धा कपूरच्या आगामी ‘ईथा’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट आता ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. आता नव्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्सच्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्युब या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून दिनेश विजन, करिश्मा शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

२८ ऑगस्टची तारीख बदलली

‘ईथा’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यापूर्वी चित्रपट २८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, निर्माते या तारखेत बदल करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त समोर आले होते. अखेर आता चित्रपटासाठी ४ डिसेंबर २०२६ ही नवी रिलीज डेट निश्चित करण्यात आली आहे. निर्मात्यांनी आपल्या निवेदनातून चित्रपटाची झलकही दिली आहे.

विठाबाई यांच्या आयुष्याची कहाणी पडद्यावर

‘ईथा’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या लोककलेतील एक मोठं नाव असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. तमाशा आणि लावणीच्या क्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटवणाऱ्या विठाबाई यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून प्रवास सुरू केला. पुढे त्यांनी महाराष्ट्रातील लोकनाट्याच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई यांची भूमिका साकारत आहे. तिच्या कारकिर्दीतील ही भूमिका विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या श्रद्धाचा या चित्रपटातील अंदाज यापेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे.

रणदीप हुड्डा आणि झीशान अय्युबही महत्त्वाच्या भूमिकेत

श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. संगीत अजय-अतुल यांचे आहे. ‘ईथा’ हा श्रद्धा कपूर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा पहिला एकत्रित चित्रपट आहे. निर्माते दिनेश विजन आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची जोडी यापूर्वी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र आली आहे. ‘लुका छुप्पी’, ‘मिमी’, ‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘छावा’ यांसारख्या चित्रपटांनंतर आता ही जोडी ‘ईथा’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT