Shraddha Das 
मनोरंजन

Shraddha Das : व्हिलेज ब्युटी क्वीन?; श्रद्धाचा हाफ साडीत दाक्षिणात्य लूक (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दिल तो बच्चा है जी' फेम आणि साऊथ अभिनेत्री श्रद्धा दास ( Shraddha Das ) नेहमीच आपल्या हॉट आणि बिकिनी फोटोंमुळे चर्चेत असते. श्रद्धाला चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखलं जाते. ती नेहमी नवनवीन हटके फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिच्या हाफ साडीतील दाक्षिणात्य लूकने धुमाकूळ घातला आहे.

श्रद्धा दासने 'लाहोर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदापर्ण केले होते. मात्र ती 'zid' या चित्रपटातील topless सीनमुळे प्रकाश झोतात आली. श्रद्धा अभिनेता अजय देवगन आणि इम्रान हाश्मीसोबतच्या 'दिल तो बच्चा है जी' या चित्रपटात दिसली होती. चित्रपटासोबत श्रद्धा ( Shraddha Das ) तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या तिने दाक्षिणात्य लूक केला आहे. या लूकमधील फोटो आणि व्हिडिओत तिने स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात श्रद्धा पोपटी रंग्याच्या हाफ साडीत एकदम हॉट दिसतेय. याशिवाय तिने ब्लॅ रंगाच्या ओढणानी कहर केला आहे.

केसांची पोनी, नेकलेस आणि मेकअपने तिच्या सौदर्यात भर घातली आहे. कधी लाजताना तर कधी ती मनमुराद हसताना क्यूट दिसतेय. यातील खास म्हणजे, श्रद्धा खजूरांच्या शेतात असून ती 'रूप सुहाना लगता है, चॉद पुराना लगता है..'या गाण्यावर मस्तीमध्ये थिरकताना दिसतेय. यावेळी तिच्या हातात घानेरीच्या फुलांची छोटीशी फांदी असून, तिने त्यातील एक- एक फुले वरती टाकल्याचे दिसते. शेवटी ती पुलांची फांदीदेखील वर फेकते. हा तिच्या मस्तीभरा व्हिडिओ चाहत्याच्या पंसतील उतरला आहे.

हा व्हिडिओ शोसल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'super mam in traditional look ❤️', 'looking beautiful ??', 'Love you cutie ?', 'How so pretty ?', 'So pretty', 'Wow soo Gorgeous?❤️', 'Pakka village girl looking beautiful half saree ?? good evening ??❤️',' Alwayzzz?', 'Husna pari?',' Gorgeous ❤️', 'Bringing Beauty in simplicity ??',' Such a cute ?', 'hot beauty??❤️'. असे लिहिले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यत ४० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

श्रद्धाने 'लाहोर' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' या चित्रपटात अभिनयाची चुणूक दाखविली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, श्रद्धा तेलुगू 'अर्धाम' आणि 'निरीक्षण' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT