Fire in Shiv Thakare House  Instagram
मनोरंजन

Fire in Shiv Thakare House | बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग, साहित्य जळून खाक, व्हिडिओ व्हायरल

Fire in Shiv Thakare House- बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग, साहित्य जळून खाक, व्हिडिओ व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

Shiv Thakare faced fire breakup at his Mumbai residence

मुंबई - बिग बॉसचा प्रसिद्ध एक्स कंटेस्टेंट शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला अचानक आग लागली. ज्यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झालेत. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भिंती, फॅन, एसी, फर्निचर, घरातील सर्व सामान जळाले आहे. अग्निशमन दलाची गाडी अपार्टमेंट खाली उभारलेली दिसत आहे. दलाचे जवान आग विझवताना दिसताहेत.

नेमकी आग कशामुळे लागली, यामागील कारण अद्याप समजलेले नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून शिव ठाकरेच्या फॅन्सना चिंता लागून राहिलीय. ही आग कोलते पाटील वर्वे बिल्डिंग येथील घरी लागली. शिवच्या टीमकडून एक जारी करण्यात आलेल्या अधिकृत स्टेटमेंट सांगण्यात आलं आहे की, अभिनेता सुरक्षित आहे आणि त्याला कुठलीही हानी झालेली नाही.

video- viralbhayani insta वरून साभार

शिव ठाकरेच्या टीमने नोटमध्ये म्हटलंय '@shivthakare9 ला आज सकाळी एका दुर्घटनेचा सामना करावा लागला. कारण कोलत पाटील वर्वे बिल्डिंग स्थित त्याच्या मुंबईतील आवासमध्ये आग लागली. त्याला कुठलीही हानी नाही. पण, घराचे खूप नुकसान झाले! या घटनेवेळी शिव ठाकरे मुंबईत नव्हता आणि कालच तो शहरातून परतलाय. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एअरपोर्टमधून एक फोटो शेअर करत लिहिलं, 'मुंबई वापस.'

शिव ठाकरेचे प्रोजेक्ट्स

शिव ठाकरेला 'बिग बॉस' नंतर फेम मिळाले. महाराष्ट्राच्या एका गावातून आलेल्या शिवने एक-एक रिॲलिटी शोच्या माध्यमातून भारतीय मनोरंजन जगतात आपली वेगळी ओळख बनवली. 'रोडीज', 'बिग बॉस' मराठी - हिंदी, 'खतरों के खिलाडी', 'झलक दिखला जा' अशा शोमध्ये तो दिसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT