TV Actress Shiny Doshi reveal about relationship with father
मुंबई - टीव्ही अभिनेत्री शायनी दोशीने आपल्या वडिलांसोबत असलेल्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. एका मुलाखतीत तिने सांगितले की, वडिलांसोबतचं नाचं ठिक नव्हतं. ते आईलादेखील खूप मारायचे. ते कधीच साईनीसोबत चांगले बोलले नाही. परिणामी, ती डिप्रेशनमध्ये गेली होती.
घरातील वातावरणाचा मुलांवर परिणाम होत असतो. आई-वडिलांचे वागणे, त्यांचा मुलासोबतचा व्यवहार कसा आहे, या सर्व गोष्टींचा परिणाम पाल्यांवर होत असतो. जर मुलांना चांगली वागणूक नाही मिळाली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत आणि मुलांना बालपणीच जर घरगुती हिंसाचार पाहायला मिळत असेल तर त्यांच्या मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
असेच काही टीव्ही अभिनेत्री शाइनी दोशी सोबत झाल. एका मुलाखतीत शाइनीने आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा त्या आठवणी कमी नाहीत, असे तिच म्हणणे आहे.
शाइनीने सांगितलं की, वडील आईला खूप मारायचे आणि भांडणावेळी आईला खूप वाईट बोलायचे. तिचे आणि वडिलांचे नाते कटू होते आणि ती कधीच आपल्या वडिलांसोबत एक चांगले नाते बनवू शकली नाही.
शाइनी जेवहा १६ वर्षांची होती, तेव्हा वडिलांनी तिला प्रॉस्टिट्यूट (वेश्या) म्हटलं होतं. त्यांनी आई, मला आणि भावाला सोडून घरातून निघून गेले होते. त्यानंतर घराची जबाबदारी तिच्यावर आली. एक वेळ अशी आली की, तिच्याकडे शाळेची फी आणि कॉलेजची फी भरायलाही पैसे नव्हते.