मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty ) गेल्या काही दिवसांत पती राज कुंद्रा प्रकरणाने चर्चेत आली होती. शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty ) नेहमी आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या शिल्पाने नुकतेच साडीतील फोटोशूट आणि 'सुपर डान्सर चॅप्टर ४' रिअॅलिटी शोमध्ये डान्सचा तडका लागावला आहे.
शिल्पा शेट्टीने नुकतेत आपल्या इंन्स्टाग्रामवर एक साडीतील फोटोशूट केला आहे. या फोटोत शिल्पा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. फोटोशूटदरम्यान शिल्पाने स्टायलिश पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
या फोटोत तिच्या साडीचा पदर हवेत तरंगताना दिसत आहे. या साडीसोबत तिने साजेशीर दागिने घातले आहेत. या फोटोत शिल्पा एखाद्या परिसारखी दिसत आहे.
शिल्पाने हा फोटो शेअर 'प्रत्येक साडी एक गोष्ट सांगते, पण, ही साडी एका कवितेतल्या परिसारखी वाटली'. असे लिहिले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांचा कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात एकाने शिल्पाला 'पांढरी परी' तर दुसऱ्याने 'तिला स्वर्गातून उतरलेली अप्सरा' असे म्हटले आहे. या फोटोला काहीच वेळात लाखो लाईक्स मिळाले आहेत.
शिल्पा शेट्टीने 'सुपर डान्सर चॅप्टर ४' रिअॅलिटी शोच्या शेवटच्या भागात चाहत्याचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 'सुपर डान्सर चॅप्टर ४' रिअॅलिटी शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यादरम्यान शिल्पाने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
या शोदरम्यान शिल्पा शेट्टी 'आफरीन आफरीन', 'मेरे रश्के कमर', 'पानी पानी हो गई' आणि 'नदीयों पार' सारख्या गाण्यांवर ठुमके लगावणार आहे. राज कुद्रा जेलमधून बाहेर पडताच शिल्पाने या शोमध्ये पोहोचली आहे.
शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर चॅप्टर ४' या शोमध्ये दिसत आहे. याआधी ती शेवटची 'हंगामा २' चित्रपटात दिसली होती. याशिवाय शिल्पा आगामी 'निकम्मा' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाछी चाहत्यांचा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.