जॅकलीन-शिखर धवन यांचं नवं गाणं लवकरचं येत आहे Instagram
मनोरंजन

Shikhar Dhawan-Jacqueline Besos Teaser | 'बेसोस' गाण्यातून हिट ठरणार शिखर धवन-जॅकलीनची जोडी, टीजर रिलीज

Shikhar Dhawan-Jacqueline Fernandez Besos Song Teaser | जॅकलीनचे डान्स मुव्ह्ज आणि शिखर धवन स्टायलिश लूकने बेसोस गाणं गाजवणार.

स्वालिया न. शिकलगार

शिखर धवन-जॅकलीन जोडी लवकरच 'बेसोस' गाण्यातून हिट ठरणार आहे. नुकताच या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याला गायिका श्रेया घोषाल आणि इंटरनॅशनल आर्टिस्ट कार्ल वाईनने आवाज दिला आहे.

Shikhar Dhawan-Jacqueline Besos Song Teaser out

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आणि माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनचा नवा म्युझिक व्हिडिओ ‘बेसोस’चे टीजर अखेर रिलीज झाला आहे. दोघांच्या फॅन्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या टीजरमध्ये जॅकलीन आपल्या शानदार डान्स मुव्ह्जने स्क्रीनवर जलवा दाखवताना दिसत आहे. तर शिखर धवन आपल्या स्टायलिश लूकने लक्षवेधी ठरला आहे.

जॅकलीन फर्नांडीस-शिखर धवनचं संपूर्ण गाणं कधी रिलीज होणार?

या गाण्याला गायिका श्रेया घोषाल आणि इंटरनॅशनल आर्टिस्ट कार्ल वाईनने आपला आवाज दिला आहे. फॅन्स या अनोखी जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी उत्सुक आहे. संपूर्ण गाणे ८ मे रोजी सकाळी ११ वाजता प्ले डीएमएफच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर रिलीज होईल.

‘बेसोस’ गाण्याचे बोल राणा सोटल, फ्रीबोट आणि कार्ल वाइनने लिहिले आहेत. संगीत रजत नागपाल, फ्रीबोट आणि कार्ल वाइनचे आहे. म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन पीयूष-शाजिया यांच्या जोडीने केलं आहे.

गाण्याची झलकचं दमदार

‘बेसोस’चे टीजर रंगीन आणि जोशीले वाईब्सने भरपूर आहे. टीजरमध्ये जॅकलीनचे एनर्जेटिक डान्स मुव्ह्ज आणि शिखरचा कूल अवतार फॅन्सचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. याआधी दोघांनी इन्स्टाग्रामवर गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं- 'पॉप का तडका, जुनून का रंग. क्या आप तैयार हैं बेसोस के लिए? ...संपूर्ण गाणे ८ मे ला सकाळी ११ वाजता.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT