Shehnaaz Gill Ikk Kudi Teaser out
मुंबई - अभिनेत्री शहनाज गिलचा नवा चित्रपट इक कुडीचा टीझर समोर आला आहे. शहनाजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा टीझर शेअर केला आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
शहनाज गिलने २०१७ मध्ये पंजाबी चित्रपट "सत श्री अकाल इंगलँड" मधून चित्रपट विश्वात एन्ट्री केली होती. पण शहनाजला खरी प्रसिद्धी मिळाली ती २०१९ च्या "बिग बॉस १३" मधून. त्यामुळेच सिद्धार्थ शुक्ला सोबत तिची मैत्री सर्वश्रुत झाली. तिने २०२३ मध्ये रिलीज झालेला चित्रपट "किसी का भाई किसी की जान"मध्ये सलमान खान सोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात पूजा हेगडे आणि डग्गुबति व्यंकटेश देखील दिसले होते.
शहनाजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपट रिलीज तारीख घोषित करत लिहिलं- 'इक कुडी' १९ सप्टेंबर पासून चित्रपटगृहात." राया पिक्चर्ज्, शहनाज गिल प्रोडक्शन आणि आरमर फिल्म द्वारा प्रस्तुत "इक कुडी"ची पटकथा दिग्दर्शक अमरजीत सिंह सैरनने लिहिली आहे. तर कौशल जोशी निर्माते आहेत.
याआधी शहनाज गिलने घोषणा केली होती की, ती आपल्या नव्या पंजाबी चित्रपटाचे शूटिंग सुरू करायला जात आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा मुहूर्त इव्हेंटचे फोटो शेअर केले होते. एका फोटोत ती क्लॅपरबोर्डसह पोज देताना दिसते. तर दुसऱ्या फोटोत शूटिंगच्या आधी प्रार्थना करताना दिसली होती.
अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशाला पहिल्याच दिवशी बिग बॉस-१९ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावेळी बिग बॉसने १५ कंटेस्टेंट निवडण्यासाठी जनतेकडून वोटिंग मागवले होते. जनतेने सोशल मीडिया स्टार मृदुल तिवारीला अधिक मते दिली. शहबाज बदेशाला पराभूत व्हावं लागलं.