Shefali Jariwala Death
मॉडेल, अभिनेत्री शेफाली जरीवालाचे काल रात्री निधन झाले. ती 42 वर्षांची होती. सुपरफिट असलेली अभिनेत्री शेफालीच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबियांसह चाहत्यांनाही धक्का बसला. शेफाली 2002 मध्ये कांटा लगा या गाण्यातून तिने डेब्यू केला. या गाण्याने त्यावेळी तिची बोल्ड इमेज निर्माण झाली होती. शेफालीने यानंतर संगीतकार, गायक हरमीतसिंग याच्याशी लग्न केले.
पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर चार ते पाच वर्षातच हरमितसिंगसोबत शेफालीने घटस्फोट घेतला. यानंतर तिची भेट झाली पराग त्यागीसोबत.
या मलिकेत परागने केले आहे काम
पराग मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. पराग आणि शेफालीने 2004 मध्ये लग्न केले. शेफाली चे ही दुसरे लग्न होते. A wednesday या सिनेमातून पराग मोठ्या पडद्यावर झळकला.
पण परागला ओळख मिळाली ती पवित्र रिश्ता या मालिकेतून. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकीता लोखंडे मुख्य भूमिकेत होते. या मालिकेमुळे परागला रातोरात स्टार बनवले. त्यानंतर नाम आणि जोधा अकबर या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय 'प्यार को हो जाने दो', 'काला टीका', 'ब्रह्मराक्षस: जाग उठा शैतान' या सारख्या सिरियलमधूनही त्याने ओळख बनवली.
एका पार्टीत पराग आणि शेफालीची ओळख झाली होती. तेव्हा ती आधीच्या अपयशी नात्यामुळे उदास होती. पण परागच्या केयरिंग आणि साधेपणामुळे ती प्रभावित झाली. या नात्याची सुरुवात मैत्रिने झाली आणि नंतर ही दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. बिग बॉसमध्येही शेफालीने पती पराग हा अत्यंत केयरिंग आणि प्रेम करणारा असल्याचे सांगितले होते.
शेफालीच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमधून घरी येताना परागला स्पॉट केले गेले. चेहऱ्यावर अत्यंत दुखी भाव आणि अश्रू अनावर होत असलेल्या परागला पाहून अनेकांनी त्यांच्यासाठी सांत्वनपर मेसेज सोशल मिडियावर लिहिले आहेत.