पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आईने अभिनेता शीझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. शीझानने तुनिषाला (Tunisha Sharma) फसवलं आहे. त्याचे दुसऱ्या तरुणीसोबत संबंध होते, तरीही तो तुनिषाला फसवत राहिला. शीझानला सोडू नये, त्याला शिक्षा मिळावी, असे तुनिषाची आई वनिता शर्मा म्हणाली. त्या एका वृत्तसंस्थेशी बोलत होत्या. (Tunisha Sharma)
दरम्यान, तिच्या काकांनी देखील याबाबत खुलासा आहे की, त्यांना तुनिषाने फोन करून सांगितले होते की, शीझानने तिला फसवलं आहे. तिच्यासोबत चीटींग केली आहे.
तुनिषाच्या आईचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्या म्हणत आहेत की, 'मी आज मीडियावाल्यांना सांगू इच्छिते की, शीझानने तुनिषाला धोका दिलाय. तिच्यासोबत रिलेशनशीप राहिला. लग्नाचे वचन देऊन त्याने तुनिषाशी ब्रेकअप केलं. याआधी त्याचे दुसऱ्या तरुणीसोबत संबंध होते. तरीही तो तुनिषासोबत रिलेशनशीपमध्ये राहिला. मला इतकंच सांगायचं आहे की, त्याला शिक्षा मिळायला हवी. शीझानला सोडू नये. माझी मुलगी गेलीय. मीडियाने खूप मदत केलीय. मी माध्यमांचे मनापासून आभार मानते.'
याआधी शीजानच्या आईचे स्टेटमेंट समोर आले होते. त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मला केवळ इतकचं सांगायचं आहे की, तुनिषा खूप प्रेमळ मुलगी होती. ती माझीदेखील चांगली मुलगी होती. याप्रकरणी पोलिस आपलं काम करत आहेत. माझा मुलगा शीझानदेखील पोलिसांना सहकार्य करत आहे. हे एक मोठे प्रकरण आहे. सत्य समोर येईलचं.' याआधी शीझानच्या बहिणीकडूनही अशीचं प्रतिक्रिया आली होती.