मनोरंजन

Munjya : शर्वरी वाघचा ‘मुंज्या’ ६० कोटींच्या घरात; ‘चंदू चॅपियन’ ला टाकलं मागे

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री मोना सिंह आणि मराठी अभिनेत्री शर्वरी वाघ यांचा 'मुंज्या' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट रिलीज होवून आता ११ दिवस लटले आहेत. कालच्या ईदच्या मुहूर्तावर चित्रपटाने ६० कोंटीच्या जवळपास पोहोलेला आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाने बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याच्या बायोपिक 'चंदू चॅपियन' चित्रपटाला मागे टाकलं आहे.

अभिनेत्री मोना सिंह आणि शर्वरी वाघ यांचा 'मुंज्या' हा चित्रपट बॉक्स आफिसवर हिट ठरला आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे दिवसेंदिवस कमाईचे आकडे वाढतच चालले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'मुंज्या' ने रिलीज होताच पहिल्या दिवशीच ४ कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३५.३ कोटींची कमाई केली. आणि दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 'मुंज्या' ने ३.५ कोटींची कमाई केली. दुस-या शनिवारी या चित्रपटाने ६.५ कोटी, तर दुसऱ्या रविवारी 'मुंज्या'ने ८.५ कोटींचा गल्ला जमविला आहे.

रिलीजच्या ११ व्या दिवशी म्हणजे, ईदच्या मुहूर्तावर दुसऱ्या सोमवारी ४.३५ कोटी रुपयांची कमाई केली. 'मुंज्या'चे एकूण कलेक्शन आता ५८.१५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. यानंतर चित्रपट निर्मात्यांनी 'मुंज्या' लवकरच ६० कोटींचा टप्पा पार करेल आणि १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाने कार्तिक आर्यन याच्या 'चंदू चॅपियन' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 'चंदू चॅपियन' चित्रपटाने बॉक्स आफिसवर सोमवारी ४.७५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने एकूण ३८ कोटींची कमाई केली.

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' हा चित्रपट ७ जून २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात मोना सिंह शर्वरीसोबत अभय वर्मा, सत्यराज, सुहास जोशी आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन आणि अमर कौशिक यांनी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. 'मुंज्या' हा चित्रपट लोककथा आणि पौराणिक कथावर आधारित आहे.

हेही वाचा 

(photo : viralbhayani instagram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT