मनोरंजन

Shanaya Kapoor : ‘वृषभा’ तून होणार शनन्याचे पदार्पण

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : संजय जय कपूर-महिप कपूर यांची कन्या शनया कपूर ( Shanaya Kapoor ) बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली असून नंदा किशोर यांच्या वृषभा चित्रपटातून ती झळकेल. हा चित्रपट तेलुगू, मल्याळम, तामिळ, कन्नड व हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. तेलुगू-मल्याळम चित्रपटातील मुख्य भूमिका मोहनलाल साकारणार आहे.

सलमा आगाची कन्या झारा खान व रोशन मेका यांचाही या चित्रपटात समावेश असेल. हा चित्रपट याच महिन्याच्या उत्तरार्धात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. एव्हीएस स्टुडिओ, फर्स्ट स्टेप मुव्हीज व बालाजी टेलिफिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. शनन्याने या आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल उत्सुकता असल्याचे नमूद केले.

शनन्या ( Shanaya Kapoor ) याशिवाय करण जोहरच्या बेधडक चित्रपटातूनही झळकणार असून या चित्रपटात लक्ष्य व गुफतिह पिरजादा यांच्या भूमिका असतील. यापूर्वी मार्च २०२२ मध्येच तिने या चित्रपटातील फर्स्ट लुकचा एक स्नॅप इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल, हे अद्याप जाहीर केले गेलेले नाही.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT