मनोरंजन

अलिबागमध्ये १० कोटींचा बंगला घेणाऱ्या सुहाना खानचे शिक्षण झालंय तरी किती?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ' द आर्चीज'मधून डेब्यू करणारी अभिनेत्री सुहाना खानचा आज २२ मे रोजी वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वी तिने अलिबागमध्ये १० कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली होती. तिने या प्रॉप्रर्टीमध्ये स्वत:चे पैसे गुंतवल्याचे म्हटले जाते. समुद्र किनारी बंगला खरेदी करण्यासाठी तिने स्टॅम्प ड्यूटीसहित १० कोटी रुपये खर्च केल्याचे म्हटले जाते. तुम्हाला माहितीये का, ती किती कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. अखेर तिचे शिक्षण किती झाले आहे?

सुहाना खान मुंबईमध्ये लहानाची मोठी झालीय. पण उच्च शिक्षणासाठी ती भारताबेहर गेली होती.

सुहाना खान

किती शिकलीय सुहाना खान?

  • शालेय शिक्षण धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले आहे
  • शाळेत ती आपल्या फुटबॉल टीमची कॅप्टन होती
  • उच्च शिक्षणासाठी ती परदेशात गेली
  • सुहानाने लंडनच्या आर्डिंगली कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे
  • अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी ती न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी गेली
  • तिथे तिने थिएटर शो केले

सुहाना खान कशी करते कोटींची कमाई?

सुहाना खान एक लक्झरी लाईफस्टाईल जगते. सुहाना चित्रपटात येण्याआधीत करोडपती होती. तिच्याकडे महागडे कपड्यांपासून बॅगपर्यंत महागडे कार कलेक्शनपर्यंत तिची रॉयल लाईफ आहे. शंभराव्या वर्धापनदिनानिमित्त, साबण ब्रँड लक्सने सुहाना खानला बॉडी वॉश रेंजसाठी ब्रँडची नवीन ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले. यातून ती कोटींची कमाई करते. सुहाना खान द आर्चीजच्या डेब्यू आधी ब्युटी प्रोडक्ट मेबेलिनची ब्रँड ॲम्बेसडर झाली होती. या कंपनीच्या जाहिरातीत ती नेहमी दिसायची.

सुहाना खान

सुहाना खानची याठिकाणीही आहे कोटींची संपत्ती

रिपोर्ट्सनुसार, सुहाना खानकडे न्यूयार्कमध्ये तिचे स्वत:चे एक आलीशान घर आहे. शिवाय तिच्याकडे रेंज रोवर आणि लम्बोर्गिनी सारख्या कार देखील आहेत. तिची संपत्ती १३ कोटींच्या जवळपास आहे.

सुहाना खान

सुहाना खानने या चित्रपटासाठी स्वत: गायले गाणे

सुहाना खानने आपल्या डेब्यू चित्रपटासाठ एक गाणे रेकॉर्ड केले होते. ७ डिसेंबर रोजी तिचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज' नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. हा चित्रपट जोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. सुहानाने वेरोनिकाची भूमिका साकारली होती. सुहाना प्रोफेशनल गायिका नाही. पण, स्क्रिप्टच्या डिमांडमुळे तिला आपले पहिले गाणे रेकॉर्ड करावे लागले होते.

हेदेखील वाचा-

SCROLL FOR NEXT