डीडीएलजेच्या पुतळ्याचे अनावरण लंडनमधील प्रतिष्ठित लीसेस्टर स्क्वायरमध्ये करण्यात आलं. शाहरुख खान आणि काजोल स्वत: या समारोहात सहभागी होण्यासाठी आले होते.
ddlj 30 years raj simran-statue london
यश राज फिल्म्सच्या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) ला ३० वर्षे पूर्ण होत आले आहेत. दरम्यान, बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आणि काजोल यांनी आज लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये राज आणि सिमरन यांच्या प्रतिष्ठित पोजमधील कास्य पुतळ्याचे अनावरण केले. लीसेस्टर स्क्वेअरमध्ये याआधी कोणत्याही भारतीय चित्रपटाचा पुतळा उभारण्यात आला नाहीये.
डीडीएलजेची आयकॉनिक पोज राज आणि सिमरन यांच्या पुतळ्याच्या माध्यमातूम दर्शवण्यात आलीय. यावेळी शाहरुख खानसोबत यशराज फिल्म्सचे अक्षय विधानी होते.
डीडीएलजे हा सच्च्या मनाने बनवलेला चित्रपट होता. प्रेम अडथळे कसे पार करु शकते आणि प्रेमाने भरलेली दुनिया किती सुंदर होऊ शकते.. कदाचित म्हणूनच हा चित्रपट ३० वर्षे लोकांच्या हृदयात कायम आहे.- शाहरुख खान, अभिनेता
काय आहे डीडीएलजेची त्या सीनची स्टोरी?
डीडीएलजे ही राज आणि सिमरनची कथा आहे. दोन एनआरआय तरुण-तरुणी जे युरोप आणि भारतातील प्रवासावेळी एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्याची सुरुवात किंग्ज क्रॉस स्टेशनवरून सुटणाऱ्या ट्रेन पासून होते. लीसेस्टर स्क्वेअर ठिकाणी डीडीएलजेचे एक सीन शूट केले गेले होते, जिथे राज आणि सिमरन पहिल्यांदा जातात. त्या सीनमध्ये त्या दृश्यात व्ह्यू आणि ओडियन लीसेस्टर स्क्वायर हे दोन्ही थिएटर स्पष्टपणे दिसतात.