‘सेयॉन’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून अमरननंतर शिवकार्तिकेयन आणि कमल हासन पुन्हा एकत्र दिसणार आहेत. टीझरमध्ये अॅक्शन आणि भावनिक थराराची झलक पाहायला मिळते. चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Seyon Teaser out
तमिळ अभिनेता शिवकार्तिकेयनने साऊथ सुपरस्टार कमल हासन यांच्या बॅनरखाली त्याचा नवीन चित्रपट सेयोनची घोषणा केली होती. अमरनच्या यशानंतर पुन्हा दोघे एकत्र आले असून सेयोनचा टीझर रिलीज झाला आहे.
तमिळ अभिनेता शिवकार्तिकेयनने २०२४ मध्ये अमरनच्या यशानंतर कमल हासनच्या प्रॉडक्शन हाऊससोबत त्याचा दुसरा सहयोग म्हणून त्यांच्या नवीन चित्रपट सेयोनची घोषणा केली. निर्मात्यांनी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च केले होते. आता साऊथ सुपरस्टार शिवकार्तिकेयनच्या ४० व्या वाढदिवसाला टीझर रिलीज करण्यात आला. चित्रपटाचे निर्माते खुद्द कमल हसन आहेत.
टीझरमध्ये काय खास?
शिवकार्तिकेयन एक ग्रामीण आणि रफ एंड टफ लूकमध्ये दिसतो आहे. त्याच्या अवतीभोवती मोर दिसताहेत. त्याचा हा दमदार लूक आहे. टीझरमध्ये एक पोलिस इन्स्पेक्टर त्याच्याविषयी बोलतो आणि त्याला “लॉर्ड विरुमांडी” म्हणतो.
टीझरमध्ये शिवकार्तिकेयन भगवान विरुमंदीच्या रूपात दिसमार आहे. शिवकार्तिकेयनची भूमिका एक अध्यात्मिक ॲक्शनने भरपूर दिसतं. एक वृद्ध महिला म्हणते-“OG is back”. कमल हसन Seyon चे निर्माते आहेत तर दिग्दर्शन सिवकुमार मुरुगेसन, संगीत संतोष नारायनन यांचे आहे. शिवकार्तिकेयनचा हा २६ वा चित्रपट असेल.
चित्रपटाची रिलीज डेट अद्याप गुलदस्त्यात आहे. रिपोर्टनुसार, ऑक्टोबर २०२६ मध्ये चित्रपटगृहात हा सिनेमा रिलीज होईल. दरम्यान कमल हसन यांनी टीझर शेअर करून अभिनंदन केले आहे.
शिवकार्तिकेयन शेवटचा सुधा कोंगारा दिग्दर्शित 'परशक्ती' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर तो चांगला कामगिरी करू शकला. सध्या तो वेंकट प्रभू यांच्यासोबत एका चित्रपटावर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.