मनोरंजन

मॅडम सर : करिष्‍मा सिंग ‘चिंगारी गँग’मध्‍ये जाणार?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पोलिस संबंधित मालिका साप्‍ताहिक ड्रामा, मनोरंजन तसेच रोमांचक घटनांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच मॅडम सर कथानकामध्‍ये लक्षणीय ट्विस्‍ट येणार आहे, जेथे करिष्‍मा 'चिंगारी गँग' मध्‍ये सामील होण्‍याचा निर्णय घेते.

मॅडम सर आगामी एपिसोड्समध्‍ये हसीनाची खाला (मावशी) एफआयआर दाखल करते, पण या केसमुळे हसीना गंभीर संकटात सापडेल. मीडिया डीएसपीला विचारते की, एमपीटीला वाचवण्‍यसाठी हसीनाने ही काल्‍पनिक एफआयआर केली आहे का? करिष्‍मा शिवानी ताईला भेटते आणि चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करते, तर डीएसपी या सर्व गोंधळाचा दोष हसीनाला देतो. चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍यासाठी करिष्‍माला निष्‍ठतेची चाचणी पार करावली लागेल आणि या चाचणीचा भाग म्‍हणून ती सल्‍ला देते की, हसीनाच्‍या खालाने गँगकडून मदत घेतली पाहिजे.

करिष्‍माची खरंच 'चिंगारी गँग'मध्‍ये सामील होण्‍याची इच्‍छा आहे का?

एसआय करिष्‍मा सिंगची भूमिका साकारणारी युक्‍ती कपूर म्‍हणाली की, 'करिष्‍मा धडाकेबाज पोलिस अधिकारी आहे, पण एमपीटीमध्‍ये कोणत्याच केसेस येत नाहीत. करिष्‍माची विचारसरणी अगदी चिंगारी गँगसारखी असते आणि त्‍यांना अधिक केसेसचे निराकरण करण्‍याची गरज असते. म्‍हणूनच करिष्‍मा चिंगारी गँगमध्‍ये सामील होण्‍याचे ठरविते. पण ती एमपीटी सोडून चिंगारी गँगमध्‍ये प्रवेश करेल का? याबाबत प्रेक्षकांना लवकरच उलगडा होईल.' यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT