Satya Manjrekar Mother Death
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची पहिली पत्नी दीपा मेहताचे निधन झाले असून या घटनेनंतर त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने आईच्या आठवणीत भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक जुना फोटो देखील शेअर केला आहे.
सत्य मांजरेकरने आपल्या आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले आहे – ''अगं माझ्या सुंदर मैत्रिणी - तिच्या मुलांसाठी आणि मित्रांसाठी एक छत. सर्वात दयाळू आत्मा. केतकी गोलटकर म्हणाली की, तिच्याकडून प्रेम मिळणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. खरे आहे.''
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सत्याला धीर देत “Stay Strong” असे म्हटले आहे. काहींनी लिहिले – “आईसारखा दुसरे कोणी नाही. तिची आठवण कायम तुझ्या सोबत राहील.” अनेकांनी श्रद्धांजली व्यक्त करत 'ओम शांती' अशी प्रतिक्रिया दिली.
महेश मांजरेकर यांनी १९८७ मध्ये कॉस्ट्यूम डिझायनर दीपा मेहता यांच्याशी लग्न केले होते. दोघे कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून एकत्र होते. त्यांना दोन मुले झाली. एक मुलगी अश्वमी मांजरेकर आणि एक मुलगा सत्या मांजरेकर. पण, १९९५ मद्ये त्यांचे नाते संपुष्टात आले. पण अश्वमी आणि सत्या आपल्या वडिलांसोबत राहिले. अश्विमी आणि सत्या दोघेही अभिनय क्षेत्रात आहेत.