अभिनेते सतीश शाह यांचे निधन Pudhari
मनोरंजन

Satish Shah Death: साराभाई vs साराभाई फेम अभिनेते सतीश शाह यांचे निधन

सतीश किडनी संबंधी आजाराशी झुंज देत होते

अमृता चौगुले

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. आज दुपारी 2.30 वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश किडनी संबंधी आजाराशी झुंज देत होते. तसेच त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट देखील झाले होते. त्यांची सारभाई vs साराभाई, जाने भी दो यारो आणि मै हू ना यातील त्यांच्या भूमिका गाजल्या. (Latest Entertainment News)

त्यांच्या मॅनेजरने त्यांच्या निधनाची बातमी कन्फर्म केले. त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सतीश जवळपास चार दशकांहून अधिक काळ अभिनयक्षेत्रात कार्यरत होते. 1983 मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले.

त्यानंतर हम आप के है कौन, हम साथ साथ है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कल हो ना हो, कभी हा कभी ना, ओम शांती ओम, कहो ना प्यार या सिनेमांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.

साराभाईने प्रचंड लोकप्रियता

टेलिव्हिजनवर साराभाई vs साराभाई या मालिकेतील इंद्रवदन साराभाई ही व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT