पुढारी ऑनलाईन डेस्क : सान्या मल्होत्राचा बहुप्रतीक्षित कठल चित्रपटाचा (Kathal Movie) ट्रेलर लाँच झाला. हरवलेल्या कठल (जॅक फ्रूट) (फणस) शोधण्याच्या रंजक कथा आणि नव्या संकल्पनेने ही कथा नक्कीच सगळ्यांची मन जिंकणारी आहे. (Kathal Movie)
चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून सान्या मल्होत्रा या चित्रपटात हरवलेल्या कठलला शोधण्यासाठी ग्रामीण भागातील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा ट्रेलर तुम्हाला एका मजेशीर रोलर कोस्टर राईडवर घेऊन जातो आणि जोपर्यंत तुमचे पोट दुखत नाही तोपर्यंत तुम्हाला हसवून जातो.
सान्या मल्होत्रा ट्रेलर लॉन्चच्या वेळी तिच्या लूकमध्ये बेस्ट दिसत होती. सान्याचे फॅशनचे गेम नेहमी उत्तम राहिले आहेत. रिलीजबद्दलचा जल्लोष आणि उत्साह प्रेक्षकांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तुमच्या प्रमाणेच आम्ही देखील नवीन संकल्पना अनुभवण्यासाठी आणि सान्या मल्होत्रा ग्रामीण भागात पोलिसाची भूमिका कशी करतेय हे बघण्यासाठी उत्सुक आहोत.
कठल व्यतिरिक्त सान्याकडे सौ, पाईपलाईन, सॅम बहादुर हे आगामी चित्रपट आहेत.