Sanjay Kapoor shared post about sirf tum movie
मुंबई - जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या परम सुंदरी चित्रपटाचे शूटिंग केरळमध्ये झाले आहे. सुंदर चित्रण चित्रपटात दाखवण्यात आले आहे. दरम्यान, एकेकाळचा गाजलेला अभिनेता संजय कपूरने आपल्या चित्रपटाच्या जुन्या आठवणी जागवल्या आहेत. त्याचा एक चित्रपट १९९९ मध्ये आला होता- 'सिर्फ तुम'. या चित्रपटामधील सुंदर क्षण पुन्हा अनुभवल्याबद्दल संजय कपूरने खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर संजयने एक पोस्टर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आणि प्रिया आहेत.
त्याचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट 'सिर्फ तुम' केरळमध्ये चित्रित झाला होता आणि त्याचप्रमाणे आता जान्हवी आणि सिद्धार्थचा नुकताच प्रदर्शित झालेला 'परम सुंदरी' देखील केरळमध्ये शूटिंग झाले आहे.
११ जून रोजी, सिर्फ तुम चित्रपटाच्या प्रदर्शनाला २६ वर्षे पूर्ण झाली, तेव्हा संजयने त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या तीन दशकांच्या प्रवासातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हटले होते. त्यावेळी त्याने पोस्ट मध्ये लिहिले होते-"सिर्फ तुमची २६ वर्षे, माझ्या ३० वर्षांच्या प्रवासातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक, प्रवास सुरूच आहे, या चित्रपटाला कोणीही संधी दिली नाही पण प्रेक्षकांच्या प्रेमाने तो सुपरहिट झाला #godiskind #gratitude #kerala #nainital #delhi #houston," असे हॅशटॅग देखील संजयने लिहिले होते.
बोनी कपूर निर्मित रोमॅटिक ड्रामाची कहाणी अशी एक कथा असते, ज्यामध्ये प्रियकर-प्रेयसी पत्राच्या माध्यमातून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात, पण ते कधी भेटत नाहीत.
संजयने कॅप्शनमध्ये म्हटले की, परम सुंदरीच्या शूटिंग दरम्यान, त्यांना सिर्फ तुममधील काही गोड आठवणींना उजाळा मिळाला. तो म्हणाला, "माझा नेहमीचा आवडता चित्रपट आणि संगीत, #sirftum, केरळमध्ये 'परम सुंदरी'च्या शूटिंग दरम्यानचे क्षण पुन्हा जिवंत केले." पोस्टमध्ये संजय आणि त्याची सिर्फ तुम सह-कलाकार प्रिया गिल यांचा एक स्केच देखील आहे.
संजय कपूरची ही पोस्ट पाहताच चाहत्यांनी त्याला प्रेमाचा वर्षाव केला. अनेकांनी “सर, ‘सिर्फ तुम’ हा आमच्या कॉलेज डेजचा आवडता चित्रपट होता”, “आजही तुमचं ‘दिलबर’ पाहायला आवडतं” अशा कॉमेंट्स केल्या. काहींनी तर पुन्हा एकदा ‘सिर्फ तुम २’ यावा अशी इच्छा व्यक्त केलीय.