संजय दत्तला या कारणाने नाकारला युकेचा व्हिसा  Creative Commons
मनोरंजन

Sanjay Dutt ला नाही मिळाला युकेचा व्हिसा! Son of Sardaar 2 मधून बाहेरचा रस्ता

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता Sanjay Dutt ला यूकेचा व्हिसा मिळाला नाही. दुसरीकडे 'सन ऑफ सरदार २' मध्ये संजय दत्तच्या जागी Ravi Kishan यांनी जागा घेतली आहे. अजय देवगनचा ॲक्शन कॉमेडी चित्रपट 'सन ऑफ सरदार २' चे शूटिंग २४ जुलै रोजी स्कॉटलंडमध्ये सुरु झाले होते. पण, शूटिंग दरम्यान एक मोठे वृत्त आले की, यातील प्रमुख अभिनेता संजय दत्तला यूकेचा व्हिसा मिळाला नाही.

संजय दत्तच्या हाती निराशाच

मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्तच्या भूतकाळातील रेकॉर्डमु‍ळे त्याचा व्हिसा रिजेक्ट झाला. हे पहिल्यांदा घडले नाही. जेव्हा जेव्हा संजय दत्तने यूकेच्या व्हिसासाठी अर्ज केला, तेव्हा त्याच्या हाती निराशा लागली होती.

Son Of Sardaar 2 मधून बाहेर झाला संजय दत्त

या घटनेनंतर चित्रपटाच्या टीमने तत्काळ संजय दत्तच्या जागी रवी किशन यांना चित्रपटात घेतलं. रवी किशन चित्रपट 'लापता लेडीज'मध्ये आपल्या उत्तम अभिनयासाठी खूप पसंतीस उतरले.

आपल्या ६५ व्या वाढदिवसादिवशी संजय दत्तने 'धक देवा'च्या भूमिकेत आपला पहिला लूक शेअर केला आहे. पोस्टमध्ये, संजय दत्त डेनिम जॅकेट आणि काळ्या रंगाचा रॅपअराऊंड परिधान केलेला दिसला. त्याने आपल्या गळ्यात पोलिस अधिकारीचा बेल्ट अडकवलेला आणि एक टोपी आणि बूटदेखील घातलेले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT