वाद आणि संजय दत्त हे समीकरण नवीन नाही. अगदी करियर च्या सुरुवातीपासून संजय दत्तच्या आसपास अनेक वादांचे वलय आहे. आताही त्याच्या एका व्हीडियोने नवीन वाद ओढवून घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संजयने एक व्हीडियो पोस्ट केला होता. या व्हीडियोत त्याने संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्याच या शिवाय संघाच्या देशभक्तीचेही तोंडभरून कौतुक केले होते. हा व्हिडियो व्हायरल होताच संजयच्या सोशल मिडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. (Latest Entertainment News)
इतकेच नव्हे तर कॉँग्रेस नेता सुरेन्द्र राजपूत यांनी संजयवर अत्यंत कठोर शब्दांत शरसंधान केले आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'नायक नहीं खलनायक है तू, अपने पिता का नालायक है तू…' तर संजयच्या पोस्टच्या कमेंटमध्ये एकजण म्हणतो, वडील आणि मुलात जमीन आसमानचा फरक आहे. हा बघा आपल्या वडिलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगतो आहे. हा त्या rss चे कौतुक करत आहे ज्याचा स्वातंत्र्यलढ्यात कोणताही सहभाग नव्हता. महात्मा गांधींवर सिनेमा बनवून हा त्यांचा हत्यारा असलेल्या गोडसेंचा प्रचार करतो आहे
एकाने सुनील दत्त यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘त्याचे वडील सुनील दत्त शांती, सद्भावना आणि प्रेम यांच्यासाठी उभे होती. तर हा भगव्या प्रचारासाठी उभा राहतो आहे. काही चांगले वारसे लवकर संपतात.’
आणखी एका युजरला संजयच्या अशा वागण्याचा प्रचंड धक्का बसला आहे. 'हे काय आहे. मी तुझा आदर करत होतो. तू विकला गेला आहेस.’
संजय दत्त आगामी थामा, धुरंधर, द गुड महाराजा आणि वेलकम टू जंगल या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.