Sanjay Dutt new restaurant Ebisu Cocktail controversy Instagram
मनोरंजन

Sanjay Dutt restaurant: काय आहे 'एबिसु कॉकटेल'? संजय दत्तच्या रेस्टॉरंटवर का होतेय टीका? प्राण्यांच्या क्रूरतेचा आरोप होताच उचललं 'हे' पाऊल

Ebisu Cocktail controversy-संजय दत्तचे 'अल्ता स्टेला' रेस्टॉरंट वादात! कॉकटेलमध्ये जिवंत मासा आणि आग! काय आहे 'एबिसु कॉकटेल'?

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या अंधेरीतील नवीन रेस्टॉरंटमध्ये 'एबिसु कॉकटेल' नावाच्या एका विशिष्ट ड्रिंकमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या कॉकटेलच्या ग्लासमध्ये जिवंत मासा ठेवला जात होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला. केवळ सौंदर्यासाठी मुक्या प्राण्याचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी रेस्टॉरंटवर टीकेची झोड उठवली.

Sanjay Dutt discontinues live fish cocktail controversy

सध्या सोशल मीडियावर संजय दत्तच्या नव्या रेस्टॉरंटची जोरदार चर्चा आहे, पण ही चर्चा एका वादग्रस्त कारणामुळे सुरू आहे. एक विशिष्ट ड्रिंक आहे, ज्यामुळे नेटकरी आणि प्राणी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी प्राण्यांच्या क्रूरतेचा (Animal Cruelty) गंभीर आरोप केल्यानंतर रेस्टॉरंट प्रशासनाला तत्काळ पाऊल उचलले आहे.

संजय दत्तच्या रेस्टॉरेंटमध्ये जीवंत मासा असणारे कॉकटेल

मार्च महिन्यात संजय दत्तने आपल्या मित्रासोबत मिळून एक आलीशान रेस्टॉरेंट आणि बार लॉन्च केला होता. प्रमोशनसाठी संजयने ११ मार्चला एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये Ebius Cocktail' दाखवण्यात आलं होतं. एका ग्लामध्ये एक जीवंत मासा सोडण्यात आला होता आणि ड्रिंकच्या वर आग जळत होती.

नक्की काय आहे हे प्रकरण - काय आहे 'एबिसु कॉकटेल' (Ebisu Cocktail)?

हे एक अत्यंत वेगळ्या प्रकारचे कॉकटेल आहे, जे त्याच्या प्रेझेंटशनमुळे चर्चेत आले. जिवंत मासा या कॉकटेलच्या ग्लासमध्ये ठेवला जातो. ड्रिंक सर्व्ह करताना त्याच्या वरच्या बाजूला आग लावली जाते.

टीका का होतेय?

एका प्रसिद्ध ट्रॅव्हल आणि फूड इन्फ्लुएन्सरने या रेस्टॉरंटचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये 'एबिसु कॉकटेल'चा ग्लास स्पष्ट दिसत होता.

प्राण्यांवरील क्रूरता पाहून संताप

ग्लासमध्ये जिवंत मासा पोहत असताना त्यावर अल्कोहोल ओतणे आणि वरून आग लावणे, हे अत्यंत क्रूर असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ही पोस्ट व्हायरल होताच लोक भडकले. सोशल मीडिया यूजर्सनी ही 'क्रूरता' असल्याचे म्हटले. एका यूजरने लिहिलं, "सजावटीसाठी जीवंत प्राण्याचा वापर? हे कुणालाच आवडणार नाही. क्रुरतेला प्रोत्साहन देणे बंद करा." वहीं, ॲनिमल वेलफेयरशी संबंधित अनेक संघटनांनी देखील यावर आक्षेप केला.

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. केवळ प्रेझेंटटेशनसाठी मुक्या प्राण्यांचा असा उपयोग करणे चुकीचे आहे," अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रेस्टॉरंट आणि संजय दत्तवर टीका केली.

रेस्टॉरंटने उचललं 'हे' पाऊल

वाढता वाद आणि लोकांचा संताप पाहता, रेस्टॉरंट प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला आहे.संजय दत्तच्या या रेस्टॉरंटने आपल्या मेन्यू कार्डमधून 'एबिसु कॉकटेल' हे ड्रिंक कायमचे काढून टाकले आहे. ग्राहकांच्या भावनांचा आदर करत असल्याचे रेस्टॉरेंटने म्हटले आहे.

रेस्टॉरेंट प्रशानसनाने माफीनामा जारी केला. त्यांनी लिहिलं, ''सर्व काही जसे दिसते तसे नाही. आम्ही तुमच्या चिंता गांभीर्याने घेतो. हे कॉकटेल मीन राशीपासून प्रेरित होते आणि त्यात बेट्टा माशाचा वापर करण्यात आला होता, ज्याला फायटर फिश म्हणूनही ओळखले जाते. आम्हाला वाटते की कॉकटेलमध्ये जिवंत मासे समाविष्ट करणे ही एक योग्य चिंतेची बाब आहे. प्राण्यांची सुरक्षितता आमच्यासाठी नेहमीच प्राधान्याचा विषय राहिली आहे. त्यामुळे, आम्ही ठरवले आहे की हे पेय यापुढे दिले जाणार नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT