मराठी चित्रपटसृष्टीतील भव्य प्रोजेक्ट 'राजा शिवाजी'मध्ये अभिनेता संजय दत्त हा 'अफजल खान' ही भूमिका साकारत आहे. याआधी 'धुरंधर' चित्रपटामध्ये त्याने एका पोलीस अधिकाऱ्याची (एसीपी अस्लम) भूमिका साकारून प्रशंसा मिळवली होती. मात्र, आता मोठ्या पडद्यावर ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी संजय दत्त सज्ज झाला आहे, ज्याच्या लूकची चर्चा सर्वत्र होत आहे.
Movie Raja Shivaji sanjay dutt role
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य दिव्य प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची कहाणी दाखवण्यात येईल. या चित्रपटात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये जेनेलिया डिसूजा, विद्या बालन, संजय दत्त आणि अभिषेक बच्चन यांच्यासारखे अनेक कलाकार विविध भूमिकेत दिसतील. तर या कलाकारांपैकी एक संजय दत्तची भूमिका खूप लक्षवेधी आहे.
संजय दत्त क्रूर शत्रूच्या भूमिकेत
‘राजा शिवाजी’ चित्रपटात छत्रपतींचे स्वप्न साकारत असताना दिसणार आहे.
टीजरमध्ये झलक
टीजरमध्ये संजय दत्त म्हणताना दिसतो- ‘नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता है’. यावेळी टीजरमध्ये रितेश देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत रणभूमीत दिसतो. यावेळी छत्रपती 'स्वराज्या'चे स्वप्न जाहीर करतात.
प्रेक्षकांना संजय दत्तच्या 'खलनायक' अवताराचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. आता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात इतिहासातील सर्वात क्रूर शत्रूंपैकी एक असलेल्या अफजल खानची भूमिका साकारतोय. त्याच्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. संजय दत्तने याआधी 'अग्निपथ'मध्ये कांचा चिना आणि 'केजीएफ-२' मध्ये अधीरा सारख्या भयानक खलनायकी भूमिका अजरामर केल्या आहेत.
चित्रपटाबद्दलच्या काही खास गोष्टी
कांचा चिना आणि अधीराच्या यशानंतर, संजय दत्तला ऐतिहासिक पात्रात पाहता येणार आहे. संजय दत्तने आपल्या कारकिर्दीत नेहमीच विविधांगी भूमिका केल्या आहेत.
संजय दत्तचा लूक: व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये संजय दत्त अत्यंत रांगडा, क्रूर आणि अक्राळविक्राळ दिसत आहे. त्याच्या डोळ्यातील तीक्ष्णता आणि भारदस्त शरीरयष्टी दिसत आहे.
रितेश देशमुखचे दिग्दर्शन: 'वेड'च्या तुफान यशानंतर रितेश देशमुख या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्याने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि भव्य सेटमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
पॅन-इंडिया रिलीज: हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीसह इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संगीत: अजय-अतुलच्या सुरावलींनी ट्रेलरमध्येच रोमांच उभे केले आहेत.
खलनायक: सुभाष घई यांच्या खलनायक या चित्रपटात संजय दत्तचा सर्वात शानदार परफॉर्मन्स आहे. यामध्ये त्याने बल्लू नावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गाणे नायक नही खलनायक हूं मैं हे इतकं प्रसिद्ध झालं की, ते आजही आठवणीत आहे.
अग्निपथ : कांचा चीनाच्या भूमिकेत संजय दत्त 'अग्निपथ'मध्ये दिसला. संजय दत्तचा टकला, भयभीत करणारा कांचा चीना हा बॉलिवूडच्या सर्वात अविस्मरणीय खलनायकांपैकी एक आहे. एका क्रूर ड्रग लॉर्डच्या भूमिकेत, दत्तने एक भीतीदायक पण तरीही आकर्षक अभिनय सादर केला. ऋतिक रोशनच्या समोर एक शक्तीशाली विलन रूपात होता.
धुरंधर : यात संजय दत्तने 'एसीपी चौधरी अस्लम' ही भूमिका साकारली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून त्याला ओळखले जाते. संजय दत्तची ही भूमिका वाखाणण्याजोगी आहे. त्याची चालण्याची स्टाईल, बोलण्याची लकब आणि बंदुकीचा परफेक्ट निशाणा, पर्सनॅलिटी सर्वकाही जुळून आलं. पाकिस्तानमधील 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' चौधरी अस्लम यांच्या आयुष्यावर आधारित ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
राजा शिवाजी : आता तो थेट क्रूर शत्रूच्या म्हणजेच 'अफजल खानाच्या' भूमिकेत दिसेल. त्याला रितेश देशमुख विरुद्ध पाहणे, हे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल. १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीपासून ते इतिहासातील सर्वात क्रूर शत्रूपर्यंत संजय दत्तचा थक्क करणारा आहे.