comedian samay raina '12th Fail' actress medha shankr dating buzz
कॉमेडियन समय रैना आणि 12 वी फेल अभिनेत्री मेधा शंकर यांना अलीकडेच एकाच ठिकाणी पाहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्या कथित नात्याबाबतच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. '12th Fail' चित्रपटातील मेधा आणि समय हे दोघे एकत्र स्पॉट झाले. पण ते वेगवेगळे चालत असताना पापराझींनी ते स्पॉट झाले. तरी या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये विविध अंदाजांना उधाण आले आहे.
या दोघांची नावे एकमेकांशी जोडली जाण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही सार्वजनिक ठिकाणी त्यांची उपस्थिती आणि सोशल मीडियावरील काही संवादांमुळे डेटिंगच्या अफवा वारंवार समोर आल्या होत्या. मात्र, समय किंवा मेधा या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नाही किंवा या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या सर्व चर्चा अद्याप केवळ तर्क-वितर्कांच्या पातळीवरच आहेत.
दरम्यान, हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, चाहते पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याविषयी वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत. हा एक साधा योगायोग आहे की त्यामागे काही वेगळी कहाणी दडली आहे, याबाबत उत्सुकता कायम आहे.
दोघे एकत्र दिसताच डेटिंगच्या चर्चांना पुन्हा वेग
सोशल मीडियावर एका युजरने कॉमेडियन समय रैना आणि अभिनेत्री मेधा शंकर यांना नुकतेच एकाच ठिकाणी पाहिल्याचा दावा केला आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि काही वेळातच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्या युजरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "मित्रांनो, समय रैना आणि मेधा शंकर एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यांना एकत्र पाहिले गेले आणि पापाराझी दिसताच ते वेगवेगळ्या दिशेने निघाले. याआधीही ते अनेकदा एकत्र दिसले आहेत. याबद्दल तुमचे मत काय?"
याआधीच्या सार्वजनिक भेटी, तसेच सोशल मीडियावरील त्यांच्या हलक्याफुलक्या संवादांमुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. कमेंट्समध्ये अनेक चाहत्यांनी या दोघांना "नवीन आवडती जोडी" असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
व्हायरल चर्चांवर दोघांचीही मौन भूमिका
सोशल मीडियावर विविध चर्चा आणि तर्कवितर्क सुरू असले, तरी समय रैना आणि मेधा शंकर या दोघांनीही या कथित डेटिंगच्या अफवांवर अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या त्यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर अनेक दावे आणि चर्चांना उधाण आले आहे. पण त्यांचे नाते त्यांनी सार्वजनिकरित्या कन्फर्म केलेले नाही.
मेधा शंकर कोण आहे?
अभिनेत्री मेधा शंकरने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'बीचम हाऊस' (Beecham House) या ब्रिटिश लघू-मालिकेद्वारे केली आणि त्यानंतर ती सहाय्यक भूमिकेत दिसली. '१२ वी फेल' (12th Fail) या चित्रपटामध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिच्या अभिनयाची चांगलीच चर्चा रंगली होती.
Chota Don @choga_don x account वरून साभार