Salman Khan reveal Trigeminal Neuralgia experience  Instagram
मनोरंजन

Salman Khan | 750mg ची औषधे खाऊनही साडे सात वर्ष असह्य वेदना; ट्रायजेमिनल न्यूराल्जिया बद्दल सलमानने अखेर केला खुलासा

Trigeminal Neuralgia असताना प्रचंड वेदना; 750mg ची औषधे घेत होता सलमान खान

स्वालिया न. शिकलगार

Salman Khan reveal Trigeminal Neuralgia experience chat show

मुंबई - बॉलीवूडच्या दबंग खानला आपल्या वैयक्तिक आयुष्यात काही मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. त्यापैकीच एक म्हणजे ट्रायजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) हा आजार. सलमानने तब्बल साडेसात वर्ष या आजाराचा सामना केला. त्याने सांगितले की, कशा प्रकारे प्रचंड वेदना होत असताना साडे सातशे एमजीची वेदनाशामक औषधे घ्यावी लागायची.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमानला या वेदना इतक्या जास्त होत्या की त्याला दररोज ७५० मि.ग्रॅ. औषधे घ्यावी लागत होती. एवढ्या डोसची औषधे घेतल्यानेही कधी कधी वेदना कमी होत नसत. वेदना वाढल्यावर चेहऱ्यावर, डोक्यावर आणि जबड्यात असह्य झटके बसायचे.

काय आहे आजार?

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया हा चेहऱ्याच्या मज्जातंतूमध्ये होणारा आजार असून यात प्रचंड आणि असह्य वेदना जाणवतात. या वेदना इतक्या तीव्र होतात की, रुग्णाला अगदी दैनंदिन कामसुद्धा करणे कठीण होते. सलमान खानलादेखील या आजाराने काही काळ प्रचंड त्रास दिला होता.

चॅट शोमध्ये केला खुलासा

ट्विंकल खन्ना आणि काजोलच्या चॅट शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये आमिर खान - सलमान खान पोहोचले. यावेळी सलमानने त्याला जालेल्या आजाराबद्दल त्याचे अनुभव शेअर केले. सलमान खानने ट्रायजेमिनल न्यराल्जिया विषयी सांगितलेकी, कशा प्रकारे त्याने त्याने या आजाराचा सामना केला होता.

चॅट शो टू मच विथ काजोल अँड ट्विंकलचा पहिला एपिसोड रिलीज झाला. गेस्ट म्हणून आमिर-सलमानने हजेरी लावली.

काय म्हणाला सलमान खान?

तो म्हणाला- ''मी साडे सात वर्ष हा आजार झेललो. प्रत्येक ४-५ मि. नंतर वेदना व्हायच्या. अचानक झटके लागायचे...त्यामुळे नाश्ता करण्यासाठी मला अर्धा तास लागायचा. आणि मी सरळ साधा डिनर करायचो, ज्यामध्ये मी ऑमलेट खायचो. मला अन्न खाता येत नव्हते. वेदना सहन करत होतो. ७५० एमजी पेनकिलर्स खातृ होतो, तरीही वेदन थांबायच्या नाहीत.''

पहिल्यांदा सेटवर झाल्या वेदना

सलमानने सांगितलं की, पार्टनरच्या सेटवर पहिल्यांदा ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या वेदना झाल्या होत्या. तो म्हणाला, "मी पार्टनर करत होतो. लारा तिथे होती. तिने माझ्या चेहऱ्यावरून एक केस बाजूला केला आणि तयाचवेळी मला खूप वेदना झाल्या, तेथून सुरु झालं..."

यावेळी सलमान खानने अनेक वेळा शूटिंगदरम्यान वेदना सहन करत काम पूर्ण केलं. इतक्या त्रासानंतरदेखील त्याने आपली फिटनेस, बॉडीबिल्डिंग आणि करिअरकडे लक्ष ठेवले.

८ तासांची शस्त्रक्रिया

सलमानने सांगितले की, याला सुसायडल आजार म्हणतात. सलमान म्हणाला की, यासाठी एक गामा नाईफ सर्जरी असते, ज्यामध्ये ८ तासांत चुमच्या चेहऱ्यावर स्क्रू लावले जातात. सलमान सांगितले की,, त्याची ही शस्त्रक्रिया झालीय. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला सांगितले होते की, २० त ३० टक्के वेदना जातील. पण सलमानने यावर मात दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT