सलमान खान आणि एमएस धोनी यांचा जुना फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हायरल फोटोच्या निमित्ताने सलमान खानच्या आगामी देशभक्तीपर चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ बाबत नवी माहिती समोर आली आहे. भारत-चीन सीमारेषेवरील गलवान खोऱ्यातील शौर्यकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी सलमान विशेष तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे.
salman khan ms dhoni throwback photo battle of galwan
बॉलीवुड अभिनेता सलमान खानचा बॅटल ऑफ गलवान चित्रपट एकीकड चर्चेत असताना दुसरीकडे त्याचा थ्रो-बॅक फोटो व्हा.रल होत आहे. हा एक जुना फोटो असून त्यामध्ये सलमान सोबत गायक एपी ढिल्लों आणि एक्स क्रिकेटर एमएस धोनी दिसत आहेत. हा फोटो सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसचा आहे. अतुल अग्निहोत्रीने हा फोटो शेअर केला आहे.
नेटकऱ्यांकडून प्रेम
फोटोमध्ये तिन्ही स्टार्स चिखलाने माखलेले दिसतात. ते एका गाडीसमोर उभे आहेत. ऑल-टेरेन व्हीकल (ATV) राईड नंतर घेतलेला हा फोटो असून तिघे जण फार्महाऊसमध्ये टाईम स्पेंड केल्यानंतरचा हा फोटो आहे.
'बॅटल ऑफ गलवान'ची प्रतीक्षा
'बॅटल ऑफ गलवान'चे शूटिंग तो पूर्ण करत आहे. बॅटल ऑफ गलवानचा टीजर सलमान खानच्या वाढदिवसादिवशी म्हणजेच शनिवार, २७ डिसेंबर रोजी रिलीज केला जाणार असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी म्हटलं आहे.
सूत्रांनुसार, चित्रपटाची टीम टीजरवर काम करत आहे. त्यांना वाटतं की, २७ डिसेंबरला योग्य वेळ आहे. या चित्रपटात सलमान खान याशिवाय, चित्रांगदा सिंह देखील आहेत. सलमान चित्रपटात कर्नल बिक्कुमाला संतोष बाबूची भूमिका साकारत आहे, जो शिव अरुर आणि राहुल सिंग यांनी लिहिलेल्या इंडियाज मोस्ट फियरलेस ३ (२०२२) या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे.
हा चित्रपट १५ जून २०२० रोजी कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यात झालेल्या संघर्षापासून प्रेरित आहे. ही चकमक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) मोठ्या सीमा वादाचा एक भाग होती. याचे दिग्दर्शन शूटआउट अॅट लोखंडवाला (२००७) फेम अपूर्व लाखिया यांनी केले आहे.
सलमानने ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुडौल शरीराचे केले प्रदर्शन
बॉलिवूड स्टारने २७ डिसेंबर रोजी ६० वर्षांचा होणार आहे. त्याने वाढदिवस साजरा करण्यापूर्वी वर्कआऊटचे आकर्षक फोटो शेअर केले आहेत. त्याने HIIT, वेट्स, कार्डिओ आणि घरगुती जेवणाच्या माध्यमातून आपली दिनचर्या आणि त्यातून बळकट झालेले स्नायू आणि दमदार शरीरयष्टी दाखवली. फॅन्सनी त्याला भारताचा फिटनेस आयकॉन म्हटले. वय वाढत असतानाही तो अका फिट असल्याचे म्हटले आहे.