मुंबई - बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशीपचे किस्से सर्वश्रुत आहेत. आता अभिनेत्री स्मिता जयकर यांनी त्यांच्या प्रेमाविषयी किस्सा उघड केला. 'हम दिल दे चुके सनम' (१९९९) चित्रपटात स्मिता यांनी सलमान-ॲशची सहकलाकार म्हणून काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केला होता. जवळपास २५ वर्षांनंतर आता एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटाची कहाणी, संगीत आणि शूटिंगचे किस्से तसेच सलमान- ऐश्वर्याच्या नात्याबद्दल सांगितले.
स्मिता जयकर म्हणाल्या, "त्यांचे नाते शूटिंगवेळी पुढे गेलं. चित्रपटाला त्याचा खूप फायदा झाला. दोघांच्या डोळ्यात प्रेम दिसायचं. त्यांच्या चेहऱ्यावर रोमान्स दिसत होता."
सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल बोलताना ती म्हणाली, ''हो, ते तिथे प्रेमात पडले. तिथेच त्यांचे प्रेमसंबंध फुलले. आणि त्यामुळे चित्रपटाला खूप मदत झाली. दोघांचेही डोळे तेच होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम दिसत होते. चित्रपटासाठी ते खूप चांगले काम करत होते.''
सलमान आणि ऐश्वर्याबद्दल वैयक्तिकरित्या बोलताना स्मिता म्हणाली, ''सलमान खूप वेडा आहे. तो आता कसा आहे हे मला माहित नाही. पण त्यावेळी तो होता. तो खूप चांगला आणि मोठ्या मनाचा माणूस आहे. मी त्याला सेटवर रागावलेले पाहिले नाही. कोण रागावत नाही? जर कोणी तुम्हाला भडकावले तर तुम्ही रागावणारच, बरोबर? ऐश्वर्या खूप सुंदर आहे. मेकअपशिवायही ती खूप सुंदर दिसत होती. खूप नम्र, खूप स्थिर - निदान मी तिला त्यावेळी ओळखत होते.''
हम दिल दे चुके सनम सुपरहिट चित्रपट ठरला होता. यामध्ये सलमान-ऐश्वर्याची जोडी मुख्य भूमिकेत होती. चित्रपटाची कहाणीच नाही तर पडद्यावर ॲश-सलमानची जोडीही प्रेक्षकांना आवडली होती. १९९९ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्यावेळी चित्रपटाने ५१ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाला ४५ व्या फिल्मफेयर ॲवॉर्ड्समध्ये १७ नॉमिनेशन आणि ७ ॲवॉर्ड मिळाले होते.