'हाऊसफुल ५' चा टीजर आज रिलीज करण्यात आला  x account
मनोरंजन

Housefull 5 Teaser | अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल ५' चा दणक्यात टीजर रिलीज, १८ स्टार्सचा टोटल धमाका!

Housefull 5 Teaser Out | अक्षय कुमारससोबत यो-यो हनी सिंहचे म्युझिक, 'हाऊसफुल ५' ने दणाणणार थिएटर

स्वालिया न. शिकलगार

Sajid Nadiadwala Akshay Kumar Housefull 5 Teaser

मुंबई : अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘हाऊसफुल ५’ चा टीजर रिलीज झाला आहे. कॉमेडी मर्डर मिस्ट्री असणाऱ्या या चित्रपटात अक्षय कुमारच्या जोडीला यो यो हनी सिंह दिसणार आहे. यो यो हनी सिंहच्या म्युझिकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये बॅकग्राऊंडला हनी सिंहचे लाल परी गाणे ऐकू येतं.

ब्लॉकबस्टर ठरणार 'हाऊसफुल ५'

साजिद नाडियाडवालाच्या या चित्रपटाचे टीजर नाडियाडवाला ग्रँडसनच्या ऑफिशियल यू-ट्यूबवर लॉन्च केलं आहे. फॅन्स आता हनी सिंहच्या गाण्याचे कौतुक करत कॉमेंट केले आहेत. यो यो हनी सिंह आणि अक्षय कुमारचा चित्रपट ब्लॉकबस्टर ठेरल, असेही काहींनी म्हटले आहे.

'हाऊसफुल ५' मध्ये १८ स्टार्सचा तडका

तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार सोबत श्रेयस तळपदे, संजय दत्त, निकेतन धीर, फरदीन खान, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडीस, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंह, नरगिस फाखरी, रंजीत, सौंदर्या, जॉनी लीवर आणि चंकी पांडे यांच्या भूमिका असणार आहे. साजिद नाडियाडवाला बॅनर अंतर्गत चित्रपट ६ जूनला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

'हाऊसफुल ५' टीजर पाहून काय म्हणाले फॅन्स?

एका युजरने लिहिलं, ‘यो यो हनी सिंहला घेतल्याविना चित्रपट चालत नाहीत.’ दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘यो यो हनी सिंह ब्लॉकबस्टर लोडिंग.’ तिसऱ्या युजरने लिहिलं, ‘हनी पाजी का गाना, ये हुई ना बात’. आणखी एखा युजरने लिहिलं-‘अक्षय कुमार आणि हनी सिंह एकत्र, आता थिएटर होणार हाऊसफुल्ल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT