Sajid Khan will come back after 7 years
मुंबई - २०१८ मध्ये #MeToo मोहिमेदरम्यान अनेक महिलांनी दिग्दर्शक साजिद खानवर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले होते. या वादानंतर साजिदचं करिअर अक्षरशः थांबलं. काही वर्षं तो चित्रपटसृष्टीपासून दूर राहिला, त्याला इंडस्ट्रीतून बॅनही करण्यात आलं. परंतु आता तब्बल सात वर्षांनंतर साजिद पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज असल्याचं समोर आलं आहे. तसेच तो एका स्टारकिडला देखील लॉन्च करणार असल्याची माहिती मिळतेय.
रिपोर्टनुसार, साजिद खान आपल्या नव्या चित्रपटाद्वारे एका लोकप्रिय स्टारकिडला लाँच करणार आहे. या स्टारकिडचं नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आलं असलं, तरी चर्चा अशी आहे की हा मोठ्या बॉलिवूड कुटुंबातील तरुण अभिनेता असणार आहे. चित्रपटाचं लेखन सुरू असून, पुढील काही महिन्यांत त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
साजिद खाननं यापूर्वी ‘हाऊसफुल’ आणि ‘हमशकल्स’ सारखे सुपरहिट कॉमेडी चित्रपट दिले होते. मात्र, #MeToo प्रकरणानंतर त्याचं करिअर पूर्णपणे कोसळलं. काही काळ त्याने ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला, पण चित्रपट दिग्दर्शनात त्याची पुनरागमनाची संधी मिळाली नाही.
आता मात्र तो ७ वर्षांच्या ब्रेकनंतर दिग्दर्शनात कमबॅक करणार आहे. दिग्दर्शक साजिद खान झी स्टुडियोजचा एक रोमँटिक-कॉमेडी ड्रामा चित्रपटातून कमबॅक करणार आहे. रिपोर्टनुसार, साजिद खानने या प्रोजेक्टविषयी आतापर्यंत कोणते स्पष्टीकरण दिलेले नाही. पण निर्मात्यांना वाटते की, साजिद खानने या चित्रपटाचे दिग्दर्शन करावे.
त्यामुळे साजिद खान पुन्हा चित्रपटाच्या दुनियेत आपला ठसा उमटवण्यासाठी तयार आहे. त्याचा नवीन प्रोजेक्ट हा फॅमिली-एंटरटेनर असणार असल्याचं सांगितलं जातं. या बातमीनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी साजिदच्या कमबॅकचं स्वागत केलं आहे, तर काहींनी जुन्या आरोपांची आठवण करून देत टीका केलीय.
सध्या साजिदच्या या प्रोजेक्टचं नाव गुलदस्त्यात असलं, तरी त्याच्या वापसीमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चेचा माहोल निर्माण झाला आहे.
झी स्टुडिओच्या एका रोमँटिक-कॉमेडी ड्रामामध्ये गोविंदाचा मुलगा यशवर्धन अभिनेता म्हणून डेब्यू करेल. तर मुख्य अभिनेत्री ‘लापता लेडीज’ फेम नितांशी गोयल दिसतेय. पण अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृपणे जाहीर करण्यात आलेले नाही.