Saiyaara Worlwide Collection  x account
मनोरंजन

Saiyaara Worlwide Collection | 'सैयारा'ची बुलेट ट्रेन सुसाट; ठरला ५०० कोटींचा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर

Saiyaara Worlwide Collection | 'सैयारा'ची बुलेट ट्रेन सुसाट; ठरला ५०० कोटींचा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर

स्वालिया न. शिकलगार

मुंबई - सन ऑफ सरदार २ रिलीज झाल्यानंतरही सैयाराची जादू अद्याप चालत आहे. अहान पांडे-अनीत पड्डा म्युझिकल रोमँटिक ड्रामा 'सैयारा'ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक गल्ला जमवणारी प्रेमकथा सैयाराने जगभरात ५०० कोटींचा गल्ला जनवत ब्लॉकबस्टर ठरला आहे.

वायआरएफ अक्षय विधानी यांची निर्मिती असलेला चित्रपट नवोदित कलाकार असून देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांचा सर्वात मोठा डेब्यू ठरला असून अवघ्या १८ दिवसांत चित्रपटाने ५०७ कोटीचा आकडा पार केला आहे.

मोहित सूरी यांनी दिग्दर्शन केले असून ग्लोबल बॉक्स ऑफिसवर २८ कोटी जनवले होते. आठवड्यात २०० कोटींचा गल्ला आणि नंतर १६ दिवसात वर्ल्डवाईड ४७८.१६ कोटींचा बिझनेस केला होता.

रिपोर्ट्सनुसार, सैयारा ५०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाल्यानंतर सर्वाधिक कमाई करणारा साऊथचा चित्रपट पोन्नियन सेल्वन-१ ला देखील मागे टाकले आहे. हा चित्रपट मणि रत्नम दिग्दर्शित होता, ज्याने २०२२ मध्ये ४९८ चे कलेक्शन केलं होतं. चित्रपटात ऐश्वर्या राय आणि चियान विक्रम यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

सैयारा - वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस (तिसऱ्या आठवड्यात):
भारत : ३७६ कोटी विदेशात : १३१ कोटी एकूण वर्ल्डवाईड : ५०७ कोटी / $५८.२८ मिलियन (४ ऑगस्ट २०२५ पर्यंत) भारत - तिसऱ्या आठवड्याचे आकडे: शुक्रवार – ५ कोटी शनिवार – ७ कोटी रविवार – ८.२५ कोटी सोमवार – २.५० कोटी तिसरा आठवडा – २२.७५ कोटी नेट एकूण भारतात – ३०८ कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT