मुंबई - यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांचा रोमँटिक चित्रपट सैयारा वर्षातील सर्वात सुंदर म्युझिक अल्बम ठरत आहे. आणि या अल्बम मधील चौथं गाणं हमसफर नुकतंच रिलीज झालं असून, आहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या प्रेमकथेतील एक नवा ऋतू या गाण्यातून उलगडलाय. याआधी आलेली तीन गाणी — सैयारा टायटल ट्रॅक, जुबिन नौटियाल यांचं बरबाद आणि विशाल मिश्रा यांचं तुम हो तो — यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता हमसफर गाणं साचेत आणि परंपरा यांनी गायलं आहे.
दिग्दर्शक मोहित सूरी यांनी सांगितलं की, हमसफर हे त्यांच्यासाठी खूप खास आहे. मोहित म्हणाला , “सचेत आणि परंपरा यांच्याकडून हे दोघं कलाकार शिकले की दोन लोक एकमेकांवर प्रभाव टाकून एकत्रितपणे संगीत कसं बनवतात. त्यामुळे अहान आणि अनीत यांनी सचेत–परंपरा यांच्या संगीत निर्मितीची प्रक्रिया जवळून पाहिली आणि त्यांच्यासोबत बराच वेळ घालवला.”
सैयारा ही यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांचं पहिला एकत्रित प्रोजेक्ट आहे. 'सैयारा' म्हणजे एक फिरणारा आकाशीय तारा, पण कवितांमध्ये याचा उपयोग एखाद्या तेजस्वी, स्वप्नवत, आणि गूढ व्यक्ती किंवा घटनेसाठी होतो — एक तारा जो नेहमी चमकत असतो, वाट दाखवत असतो, पण गाठता येत नाही. या चित्रपटातून यशराज फिल्म्स अहान पांडे या नवोदित अभिनेत्याला लॉन्च केलं आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.