Saiyaara Blockbuster collection  Instagram
मनोरंजन

Saiyaara Blockbuster | 'सैयारा' २०० कोटी पार! सुपरहिट ठरली अनीत पड्डा-अहान पांडेची केमिस्ट्री

Saiyaara Box Office Collection | 'सैयारा' २०० कोटी पार! सुपरहिट ठरली अनीत पड्डा-अहान पांडेची केमिस्ट्री

स्वालिया न. शिकलगार

Saiyaara Box Office Collection

मुंबई : मोहित सूरी यांचा 'सैयारा' चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या चित्रपटाने वर्ल्डवाईट किती रुपयांचे कलेक्शन केले जाणून घेऊया. अहान पांडे-अनीत पड्डा यांची सुंदर केमिस्ट्री चित्रपटात दिसत आहे. रोमँटिक म्युझिकल ‘सैयारा’ने सहा दिवसात २०० कोटी रुपये कमावले आहेत. वर्ल्डवाईड किती कमाई झाली?

वर्ल्डवाईड कमाई किती?

नॉन-पॅन-इंडिया चित्रपटात सहा दिवसात वर्ल्डवाईड २०० कोटी कमावणारा हा तिसरा चित्रपट बनला आहे. ‘पठान’ आणि ‘जवान’ने हा रेकॉर्ड केला होता. सात दिवसात हा आकडा २५६ कोटी रुपये झाला असून 'सैयारा' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. सैयारा हा २०२५ चा दुसरा सर्वाधिक पहिल्या आठवड्यातचं कोटींची कमाई करणारा चित्रपट बनला आहे. छावा नंतर पहिल्या आठवड्यात १७५ कोटींचा गल्ला ओलांडणारा हा पहिला नवोदित कलाकारांचा हिंदी चित्रपट ठरला आहे.

सैयाराचे कलेक्शन

पहिला दिवस - २२ कोटी

शनिवार-२६.२५ कोटी

रविवार-३६.३५ कोटी

सोमवार -२४.२५ कोटी

मंगळवार-२५ कोटी

बुधवार-२२ कोटी

गुरुवार-२० कोटी (संध्याकाळपर्यंत)

चित्रपटाचे एकूण कलेक्शन - १७५.५ कोटी

वर्ल्डवाईड कलेक्शन- २५६ कोटी

'सैयारा'ने करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे रेकॉर्डदेखील तोडले आहे. आलिया भट्ट - रणवीर सिंहच्या या चित्रपटाचे कलेक्शन १५३.५५ कोटी रुपये होतं. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन हे स्टार्स होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT