मुंबई - अभिनेता अहान पांडेचा सैयारा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. २० कोटींचे शानदार ओपनिंग चित्रपटाने पहिल्या दिवशी केले आहे. बजेट ६० कोटींचे असल्याचे सांगितले जात आहे. सिनेप्रेमी आणि समीक्षकांकडूनही चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या मुख्य भूमिका असून हा एक रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटासाठी अहान पांडेने किती फी घेतली जाणून घेऊया.
अहान पांडेचा हा बॉलिवूड डेब्यू आहे. रोमँटिक प्लॉटमुळे अहाना रातोरात स्टार बनला आहे. त्याने चित्रपटासाठी किती फी घेतली, याचा खुलासा झाला असला तरी अधिकृतपणे आकडे समोर आलेले नाहीत. रिपोर्टनुसार, व्हायआरएफद्वारे प्रोड्यूस केलेल्या चित्रपटातील नवीन स्टार्सची फीस सामान्यतः ३ ते ५ कोटी रुपये घेतल्याचे म्हटले जात आहे.
सैयाराची कहाणी एक महत्वाकांक्षी गायक कृष कपूर आणि वाणी बत्राच्या अवतीभोवती फिरते. ते कामासाठी एकमेकांना कोलॅबोरेट करतात आणि मग त्यांना प्रेम होतं. जस-जसे त्यांना प्रेम होतं, ते स्वत:अनेक अडचणींचा सामना करताना दिसतात. चित्रपटाचे साऊंडट्रॅक देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
अहान पांडे हा अभिनेते चंकी पांडे यांचा पुतण्या आणि अनन्या पांडेचा चुलत भाऊ आहे. त्याचे वडील चिक्की पांडे बिजनेसमॅन आणि आई फिटनेस एक्सपर्ट आहे. अहान पांडेने आधी दोन लघुपटात काम केलं आहे. फिफ्टी आणि जॉलीवुड असे ते लघुपट आहेत. अहानने यशराज फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. राणी मुखर्जीच्या मर्दानी २ चित्रपटासाठी त्याने असिस्ट केलं होतं. तो मॉडलिंगदेखील करतो.