Saiyaara Advance Booking
मुंबई - रिलीजच्या आधी सैयारा चित्रपटाने कमाल केलीय. यावर्षातील सर्वात रोमँटिक चित्रपट सैयारा चर्चेत आहे. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रेकॉर्ड तोड प्रदर्शन केलं आहे. अहान पांडे - अनीत पड्डा स्टारर चित्रपट सैयारा (Saiyaara) मधून हिंदी चित्रपटात पाऊल ठेवत आहेत.
बुकिंग दिवसांपासून चित्रपटाने पहिल्या दिवशीच २.६९ कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली आहे. देशभरात १ लाखांहून अधिक तिकिटे आधीच विकली गेली आहेत आणि ही संख्या तासाभराने वाढत आहे. आता रिपोर्टपासून, सैयाराने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दोन अशा चित्रपटांना मागे टाकले आहे, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर १०० कोटीहून अधिक कमाई केली आहे. सैयाराने रिलीजच्या आधीच क्रेझ निर्माण केलीय.
आता या चित्रपटाची तुलना आशिकी २ शी केली जात आहे. मुख्य क्रेज म्हमजे ॲडव्हान्स बुकिंग आहे. मोहित सुरी यांची प्रेमकथा असलेला 'सैयारा'ने रिपोर्टनुसार, शुक्रवारी ४.४१ कोटी रुपयांची आगाऊ बुकिंग केली आहे, ज्यामध्ये १.८ कोटी रुपयांची ब्लॉक बुकिंग झालीय. सैयाराला डबल डिजीटमध्ये ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
कोविडनंतर या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच नवीन चेहरे दिसणार आहेत. जॉन अब्राहम-अर्जुन कपूर सारख्या कलाकारांनी अभिनय केला असूनही, सुरी दिग्दर्शित शेवटचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट केवळ ७.०५ कोटी रुपयांवर ओपनिंग ठरला होता. हा चित्रपट २०१४ मध्ये 'एक व्हिलन' या हिट अॅक्शन थ्रिलरचा सिक्वेल होता. चित्रपटाने १६.७ कोटी रुपयांवर ओपनिंग केली होती.