Saiyaara Aneet Padda  Saiyaara Aneet Padda
मनोरंजन

Saiyaara : आई गं.., काय लाजली! 'सैयारा'मधील अभिनेत्री अनित पड्डा विमानतळावर लाजेने चूर, पाहा व्हिडिओ

Saiyaara Aneet Padda viral video : सैयारा चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अनीत पड्डा मुंबई विमानतळावर प्रसिद्धी आणि मीडियाच्या झगमगाटाची सवय नसल्याने, कॅमेरे आपल्यावर रोखलेले पाहून थोडी गोंधळली आणि लाजताना दिसली.

मोहन कारंडे

मुंबई : 'सैयारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत असून, प्रदर्शनाच्या केवळ ९ दिवसांत तब्बल २१७ कोटी रुपयांची कमाई करत नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटाच्या या भव्य यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी संपूर्ण टीम एकत्र येणार असल्याची माहिती आहे. याच सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री अनीत पड्डा शनिवारी मुंबई विमानतळावर दाखल झाली. मात्र, प्रसिद्धी आणि मीडियाच्या झगमगाटाची सवय नसल्याने, कॅमेरे आपल्यावर रोखलेले पाहून ती थोडी बावरली आणि लाजताना दिसली.

यावेळी अनीता निळ्या रंगाचा शर्ट, कॅप आणि फेस मास्क अशा अगदी साध्या आणि आरामदायक लूकमध्ये दिसली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, फोटोग्राफर्स तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिचे नाव घेताना दिसत आहेत. यावेळी ती एका मोहक निरागसतेने कॅमेऱ्यांकडे पाहताना दिसते. जेव्हा तिला फोटोसाठी कॅप आणि मास्क काढण्याची विनंती केली, तेव्हा तिने स्मितहास्य करत उत्तर दिले, "नही, मुझे शर्म आ रही है." कॅप काढण्यास नकार दिला असला तरी, अनीताने चाहत्यांना निराश केले नाही. तिने आनंदाने त्यांच्यासोबत सेल्फी काढले. सर्वांना आपुलकीने भेटल्यानंतर ती आपल्या फ्लाईटसाठी सिक्युरिटी चेककडे रवाना झाली.

'सैयारा'ची २०० कोटींच्या दिशेने घोडदौड

मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवत आहे. नवनवीन चित्रपट प्रदर्शित होऊनही त्याचा वेग कमी झालेला नाही. सॅकनिल्कच्या (Sacnilk) अहवालानुसार, चित्रपटाने केवळ नऊ दिवसांत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि येत्या काळातही चांगली कमाई सुरू ठेवण्याची अपेक्षा आहे.

काय आहे 'सैयारा'ची कथा?

या चित्रपटात अहान पांडेने (Ahaan Panday) क्रिश कपूर नावाच्या एका होतकरू पण संघर्ष करणाऱ्या संगीतकाराची भूमिका साकारली आहे. तर, अनीत पड्डा (Aneet Padda) हिने वाणी बत्रा नावाच्या एका लाजाळू कवयित्री आणि पत्रकाराची भूमिका साकारली आहे. जेव्हा क्रिशला वाणीच्या कविता सापडतात आणि तो त्यांना संगीतात बदलतो, तेव्हा त्यांच्यात एक भावनिक बंध निर्माण होतो आणि त्याचे रूपांतर पुढे प्रेमात होते, अशी या चित्रपटाची हृदयस्पर्शी कथा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT