Sairat fame Arbaj Shaikh Wedding Instagram
मनोरंजन

Sairat fame Arbaj Shaikh Wedding | 'सैराट'च्या सल्याने उरकला निकाह! सिमरनच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फेल; पाहा फोटो

Sairat fame Arbaj Shaikh Wedding | सैराट फेम अरबाज शेखचा निकाह, व्हाईट आऊटफिटमध्ये कपलने लावले चारचाँद

स्वालिया न. शिकलगार

‘Sairat’मधून प्रसिद्ध झालेला Arbaz Shaikh नुकताच विवाहबद्ध झाला आहे. पारंपरिक निकाह सोहळ्यात त्याने आणि त्याच्या पत्नीने व्हाईट आउटफिटमध्ये आकर्षक लूक साकारला असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

‘सैराट’मध्ये परशा (आकाश ठोसर) चा जिगरी दोस्त सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख लग्नबंधनात अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड सिमरनसोबत निकाह केला आहे. दोघांचे लग्नातील फोटो अरबाजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

सैराट या सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोहोचलेला (Arbaz Shaikh) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा निकाह सोहळा पार पडला असून, या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

निकाह सोहळा साधेपणात पण सुंदररित्या पार पडल्याचं फोटोंमधून दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या सोहळ्यात अरबाज आणि त्याच्या पत्नीने व्हाईट रंगाचा पेहराव निवडला होता. अरबाजने क्रीम रंगाची शेरवानी, तर सिमरनने गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती. या एलिगंट लूकमुळे कपलचा अंदाज अधिकच खुलून दिसत होता. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अरबाज शेख ‘सैराट’ चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. या चित्रपटातील त्याची सल्या ही भूमिका छोटी होती. तरीही त्याची उपस्थिती, त्याचा अभिनय लक्षात राहण्यासारखा ठरला.

लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खूप सुंदर कपल, व्हाईट लूक कमाल आहे, असे कॉमेंट्स येत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील रेड हार्ट आणि फायर इमोजी शेअर केलीय. याव्यतिरिक्त भाग्यश्री मोटे आणि प्रतीक लाड यांनीही अभिनंदन केले आहे.

'सैराट'मधून पदार्पण केल्यानंतर अरबाजने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही माध्यमांत आपली ओळख निर्माण केली आहे. 'झुंड' (हिंदी), 'घर बंदूक बिरयाणी', 'फ्री हिट दणका', 'बस्ता', 'एकदम कडक' आणि 'मुसंडी'. अरबाज नुकताच नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये एका छोट्या भूमिकेत दिसला होता. तसेच त्याने 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातही काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT