अभिनेता रणबीर कपूर नितेश तिवारीचे दिग्दर्शन असलेल्या रामायण या सिनेमामुळे चर्चेत आहे. रणबीर या सिनेमात रामाच्या भूमिकेत दिसतो आहे हे सर्वश्रुत आहे. पण या भूमिकेत रणबीर दिसण्याबाबत अनेकांनी ट्रोल केले. रणबीरची पडद्याबाहेरची भूमिका आणि आता तो साकारणार असलेली रामाची भूमिका यावरून अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. (Latest Entertainmment News)
पण सद्गुरू यांनी मात्र रणबीरची पाठराखण केली आहे. रणबीरच्या सुरू असलेल्या ट्रोलिंगबाबाबत सद्गुरूनी प्रतिक्रिया दिली आहे.
सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांनी एका मुलाखतीदरम्यान सद्गुरू यांना विचारले रणबीर कपूर रामायण मध्ये श्रीराम कशाप्रकारे साकारतील? याचे उत्तर देताना सद्गुरू म्हणतात, ‘ एका अभिनेत्याबाबत हे अत्यंत चुकीचे मत आहे. कारण त्याने यापूर्वी वेगळ्या व्यक्तिरेखात अभिनय केला आहे म्हणून? तुम्ही त्याला राम होण्याची अपेक्षा करू शकत नाही? उद्या तो दुसऱ्या सिनेमात रावणाची भूमिकाही साकारू शकतो.’
केवळ राम साकारत असलेल्या रणबीरचीच नाही तर रावण साकारत असलेल्या यशचे कौतुकही केले आहे. ते म्हणतात, ‘ यश एक हँडसम माणूस आहे.’ यावर नमित म्हणतो, ‘ यश हॅंड्सम आहेच याशिवाय देशातील एक टॅलेंटेड सुपरस्टारही आहे. लोकांना तो आवडतो. आम्ही रावणाचे सगळे रंग दाखवण्यास इच्छुक आहे. यात त्या व्यक्तिरेखेच्या सगळ्या शेडस दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.
या सिनेमातील रामाच्या व्यक्तिरेखेसोबत आध्यात्मिक पद्धतीने जोडले जाण्यासाठी रणबीरने शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. या सिनेमात अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसते आहे.