अभिनेत्री रुपाली भोसले हा मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील संजनाच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेतील तिच्या काहीश्या तिरकस भूमिकेने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. आताही एक नवीन बातमी समोर येते आहे. अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या नव्या कोऱ्या गाडीचा अपघात झाला आहे. रुपालीने व्हीडियो शेयर करत ही माहिती दिली आहे (Latest Entertainment News)
रुपालीने तिच्या गाडीचा व्हीडियोही शेयर केला आहे. या व्हीडियोत तिच्या गाडीच्या पुढच्या भागावर अपघाताच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. 'अपघात झाला वाईट दिवस' अशी पोस्ट तिने शेयर केली आहे.
रुपालीने काही महिन्यांपूर्वीच नवी मर्सिडिज गाडी घेतली होती. या वर्षाच्या सुरुवातीलाच तिने ही गाडी घेतल्याची बातमी चाहत्यांशी शेयर केली आहे. यानंतरच्या इंस्टास्टोरीमध्ये तिला एका पोस्टमध्ये टॅग केले आहे, ज्यावर लिहिले आहे की अपघातानंतरही रूपाली भोसले मॅडम तेवढ्यात ताकदीने उभ्या राहिल्या आहेत.
रुपाली सध्या लपंडाव मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यातली तिची भूमिकाही खलनायकी शेडची आहे. यातील तिच्या भूमिकेचे नाव सरकार हे आहे. अर्थात तिचा हा नवा खलनायकी अंदाज प्रेक्षकांना कितपत भावतो हे काळच सांगेल.