Ruchira Jadhav  
मनोरंजन

Ruchira Jadhav : नुसता शर्ट घालून रुचिराने लावला हॉटनेसचा तडका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : माझ्या नवऱ्याची बायको फेम माया म्हणजेच रुचिरा जाधव हिचे मेहंदी रंगाच्या लॉन्ग शर्टमधील बोल्ड फोटो इन्स्टावर पाहायला मिळताहेत. या फोटोमध्ये ती एकदम हॉट दिसतेय. (Ruchira Jadhav) हे फोटो शशांक साने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेत रुचिराने मायाची भूमिका साकारली होती. मायाच्या भूमिकेतून रुचिराला खूप प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेत गॅरीसोबतची तिची केमिस्ट्री चांगली जुळली होती. (Ruchira Jadhav)

शशांक साने यांना पोस्ट केलेल्या फोटोमध्ये रुचिराने शर्टवर फोटोशूट केले आहेत. तर आणखी काही फोटोंमध्ये ती मेहंदी रंगाचा शर्ट आणि व्हाईट रंगाची शॉर्ट परिधान केलीय. ओपन हेअर स्टाईलमध्ये तिचं रुप आणखी खुलून आलं आहे.


रुचिराने काही व्हिडिओंसोबत आपल्या बहिणीच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहायला मिळत आहे. वाढदिवस, हळद, संगीत सेरेमनीचे फोटोशूट या व्हिडिओत पाहायला मिळताहेत. तिने आपल्या बहिणीसोबतचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिन या व्हिडिओला कॅप्शन लिहिलीय- She's my best friend…She's my sister❤️ #bandhanforever. The last video is from Rutuja's sangeet ceremony (post event), exact 3 days before her marriage and the emotional state I was in… only 'sister' can understand. #eyestelleverything. रुचिराच्या बहिणीचे नाव ऋतुजा आहे. तिच्या संगीत सेरेमनीचा व्हिडिओ रुचिराने शेअर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT