Rowdy Rathore 2 new action drama  file photo
मनोरंजन

Rowdy Rathore 2 | अक्षय कुमार विना बनणार 'राऊडी राठौर'चा दुसरा भाग? नव्या स्टार्ससह येणार ॲक्शन ड्रामा!

Rowdy Rathore 2 | अक्षय कुमार विना बनणार 'राऊडी राठौर'चा दुसरा भाग? नव्या स्टार्ससह ॲक्शन ड्रामा!

स्वालिया न. शिकलगार

Akshay Kumar Movie Rowdy Rathore 2 Shelved

मुंबई- राऊडी राठौर २ च्या तयार स्क्रिप्टचा वापर करून नव्या पोलिस ॲक्शन ड्रामाची कहाणी येणार असल्याचे वृत्त आहे. नव्या स्टार्ससह निर्माते नवा चित्रपट घेऊन येत आहेत. याचा अर्थ की राऊडी राठौरचा सीक्वल बनणार नाही.

प्रभु देवा दिग्दर्शित अक्षय कुमार २०१२ मध्ये रिलीज झालेला राऊडी राठौरला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. यामध्ये सोनाक्षी सिंहा मुख्य भूमिकेत होती. यामध्ये अक्षयने डबल रोल साकारला होता. एका भूमिकेचे नाव शिवा तर दुसऱ्याचे IPS विक्रम सिंह राठौर होतं.

यानंतर Rowdy Rathore २ येईल, अी चर्चा होती. पण, असे वृत्त समोर आले की, Rowdy Rathore 2 आता येणार नाहीय त्याऐवजी निर्माते नव्या ॲक्शनपटाची कथा आणणार आहेत.

अनुभवी पटकथा लेखक वी. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. या पटकथामध्ये आता महत्वपूर्ण संशोधन केले जात आहे. रिपोर्टनुसार, प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते पुढील वर्षी हाय पोलिस ड्रामाची निर्मिती सुरु करणार असल्याचे समजते. पण नव्या ॲक्शनपटासाठी कलाकारांची निवड अद्याप झालेली नाही. पण, सिद्धार्थ मल्होत्राचे नाव पुढे आले आहे. निर्माता एक एक कठोर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारू शकेल, अशा अभिनेत्याच्या शोधात आहे.

'राऊडी राठौर' बॉक्स ऑफिस कलेक्शन

१ जून, २०१२ रोजी रिलीज झालेला चित्रपट राउडी राठौरला प्रभु देवाने दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे प्रोडक्शन संजय लीला भन्साळी यांचे होते. हा चित्रपट २००६ मध्ये रिलीज झालेला तेलुगू चित्रपट विक्रमाकुडुचा हिंदी रीमेक होता. तेलुगू चित्रपटात रवि तेजा मुख्य भूमिकेत होता. ‘राऊडी राठौर’चे बजेट ४५ कोटी रुपये होतं, तर बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने १९८ कोटींचे वर्ल्डवाईड कलेक्शन केलं होतं. चित्रपटाने भारतात १७२ कोटी कमावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT