मनोरंजन

Romantic Movie Ek Ti : रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ मराठी ओटीटीवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी 'एक ती' चित्रपटाचा (Romantic Movie Ek Ti ) १२ फेब्रुवारी २०२४ रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत दिसणार आहेत. (Romantic Movie Ek Ti )

संबंधित बातम्या –

व्यक्ती आवडणं. प्रेम व्यक्त करणं. प्रेमात बेधुंद होणं. वाट्याला विरह येणं. हे सगळं या चित्रपटात पहायला मिळणार असून या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करून सोडणार आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे.

SCROLL FOR NEXT