मराठमोळा अभिनेता शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार  instagram
मनोरंजन

Raanti Movie | रोहित शेट्टीने केला 'रानटी'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

मराठमोळा अभिनेता शरद केळकरचा रानटी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - दिग्दर्शक समित कक्कड रानटी हा धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीनो या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते.पण जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी काही जणांना रानटी व्हावे लागते. आजूबाजूची परिस्थिती त्यांना तसं बनवत असेल कदाचित त्यामुळेच काही रानटी असतात तर काही बनतात… आता समित कक्कड २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात.

निर्माते पुनीत बालन म्हणाले की, मराठीत अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी हटके मसालेदार विषय घेऊन येण्याचा आमचा मानस होता. मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

अभिनेता शरद केळकर मुख्य भूमिकेत

पिळदार शरीरयष्टी, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेला अभिनेता शरद केळकर ‘रानटी’ मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. ‘रानटी’ च्या पोस्टर, टीझर, ट्रेलर मधून शरदचं 'अँग्री यंग मॅन' रूपचं समोर आलं आहे.

रानटी चित्रपटात 'हे' असतील तगडे कलाकार

सोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT