rock on  
मनोरंजन

15 Years @Rock On – अभिषेक कपूरचा “रॉक ऑन” आजही मनावर रुंजी घालणारा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयकॉनिक चित्रपट "रॉक ऑन" ला १५ वर्षे झाली. (15 Years @Rock On) या चित्रपटाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. ज्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान कोरलं. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण चित्रपट होता. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आणि आज १५ वर्षांनी देखील हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. (15 Years @Rock On)

२००८ मध्ये रिलीज झालेला " रॉक ऑन" केवळ चित्रपट नव्हता तर संगीत प्रेमीसाठी बेक अनोखी पर्वणी असलेला हा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. मैत्री, स्वप्न आणि संगीत यांचा मिलाप असणाऱ्या चित्रपटाची कथा प्रेक्षकांनी आपलीशी केली आणि या चित्रपटाने यश कमावलं. अभिषेक कपूरने चित्रपटाची १५ वर्षे साजरी करताना सांगितलं." हा चित्रपट अगदी काल आज घडल्या सारखा वाटतो.

दरवर्षी हा दिवस चित्रपटाच यश साजर तर करतोच पण १५ वर्षांनंतरदेखील हा चित्रपट आजही प्रेक्षकांना मोहित करून जातो. या साठी मी कायम प्रेक्षकांचा ऋणी राहणार आहे. रॉक ऑन ने मला ओळख संपादन करून दिली आणि हा चित्रपट वर्षानुवर्षे असच प्रेम मिळवत राहणार यात शंका नाही.

बॉलीवूडच्या जगात संगीतावर आधारित चित्रपटाची कहाणी त्यातली पात्र ही कायम सगळ्यांच्या मनात राहून गेली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अर्जुन रामपाल असे दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या कल्ट क्लासिक चित्रपटाची सुपरहिट १५ वर्ष पुन्हा एकदा चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT