Yuzvendra Chahal hints at relationship with RJ Mahvash
मुंबई - सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आर जे महवशचे नाव मागील काही महिन्यांपासून क्रिकेटर युजवेंद्र चहलशी जोडलं जात आहे. ती चहलला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा दोघे एकत्र दिसतात. कधी जाहिरातीत तर कधी स्टेडियममध्ये. एकीकडे महवश त्यांच्यात केवळ मैत्री असल्याचे सांगते. दुसरीकडे युजवेंद्र चहलने नेटफ्लिक्सवर द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये स्पष्ट सांगितलं की, संपूर्ण इंडियाला त्याचे रिलेशनशीप स्टेटस माहिती झालं आहे. यावरून चाहते ही हिंट असून ती सीक्रेट गर्लफ्रेंड आर जे महवशच असल्याचे म्हटले जात आहे.
क्रिकेटर युजवेंद्र चहल, ऋषभ पंत आणि अभिषेक शर्मा तिघे द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी कृष्णा अभिषेकने तरुणीचा अभिनय साकारून युजवेंद्रवर विनोद करायला सुरुवात केली. कृष्णाने युजवेंद्रला जूसी चहल म्हटलं. मज्जामस्ती सुरु असताना कृष्णा चहलला म्हणाला, 'डरते क्यों हो। बाकी इंस्टाग्राम पर देखा है। डरते तो नहीं ज्यादा।'
काही वेळानंतर कीकू शारदा युजवेंद्रची बॅग चेक करते आणि त्याच्या पांढऱ्या शर्टव लिपस्टिकचे मार्क दिसतात. तो म्हणतो, ये क्या चल रहा है, युजवेंद्र चहल जी। कौन है ये। पूरा इंडिया जानना चाहता है। आज कल बडे आप ऐसे रहते हो हां। कौन है ये।
उत्तरादाखल युजवेंद्र हसत म्हणतो-इंडिया जान चुका है. हे ऐकून कार्यक्रमात एकच हशा पिकतो.
युजवेंद्र चहल-धनश्री वर्माच्या घटस्फोटानंतर महावशला चहलसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले. काही दिवसांपूर्वी दोघांचा डिनर डेटचा एक व्हिडिओ समोर आला होता. याशिवाय महवश अनेकदा युजवेंद्रसोबत क्रिकेट सामन्यावेळी स्पॉट झाली आहे.
आरजे महवशचा जन्म अलीगढमध्ये जाला असून तिने अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून पदवी घेतलीय. तिने जामिया मिलिया इस्लामिया नवी दिल्लीतून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तिने रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ती एका एफएममध्ये काम केलं आहे. तिच्या सुंदर आवाजाने तिला लोकप्रिय बनवलं आहे. ती प्यार पैसा और प्रॉफिट या वेबस रीजमध्येही झककली होती.