RJ Mahvash Ex Boyfriend Pudhari
मनोरंजन

RJ Mahvash Ex Boyfriend: दुसऱ्या मुलींशी चॅटिंग, पकडल्यावर पॅनिक अटॅकचंं नाटक; RJ महवशने सांगितला रिलेशनशिपमधला धक्कादायक अनुभव

RJ Mahvash Ex Boyfriend: आरजे महवशने तिच्या पूर्वीच्या बॉयफ्रेंडच्या विचित्र वागणुकीचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

Rahul Shelke

RJ Mahvash Ex Boyfriend: सोशल मीडियावर आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असणारी प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि कंटेंट क्रिएटर आरजे महवश पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने आपल्या पूर्वीच्या रिलेशनशिपमधील एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. बॉयफ्रेंडचे दुसऱ्या मुलींशी सुरू असलेले चॅटिंग पकडले की तो चक्क पॅनिक अटॅक आल्याचं नाटक करायचा, असा खुलासा तिने केला आहे. तिचा हा अनुभव ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आरजे महवशने इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये तिच्या पूर्वीच्या बॉयफ्रेंडच्या वागण्याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली की, जेव्हा जेव्हा ती त्याचे मेसेज किंवा मोबाईलमधील काही संशयास्पद गोष्टी पकडायची, तेव्हा तो अचानक पॅनिक अटॅक आल्यासारखे वागू लागायचा. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दाखवायचा. पाणी आणा, असे म्हणत तो रडण्याचं आणि ओरडण्याचं नाटक करायचा.

मात्र, त्याचं हे नाटक असल्याचं आरजे महवशला माहिती झालं. तिने सांगितलं की, एकदा ती त्याच्यासाठी पाणी आणायला खोलीबाहेर गेली. खोलीत एक आरसा होता. त्या आरशातून तिला त्याचे प्रतिबिंब दिसत होते. ती बाहेर गेल्यानंतर तो अगदी शांतपणे बसून मोबाईल स्क्रोल करत होता. मात्र, ती खोलीत परत येताच त्याने पुन्हा पॅनिक अटॅक आल्यासारखे वागायला सुरुवात केली.

खोटं बोलण्यासाठी काय करायचा?

महवशने पुढे सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेंडला खोटं बोलण्याच्या काही युक्त्या माहीत होत्या. खोटं बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांत डोळे घालून बोलायचं. त्यामुळे समोरच्याला आपले बोलणे खरे वाटते, असं त्याला वाटायचं. मात्र, तो इतका वेळ तिच्याकडे एकटक पाहायचा की, पापण्याही हलवायचा नाही. त्यामुळे त्याचे खोटे बोलणे तिच्या लक्षात यायचे.

वारंवार माफ केलं, पण म्हणायचा...

महवशने सांगितलं की, तिच्या बॉयफ्रेंडचे अनोळखी मुलींसोबतही मेसेजवर बोलणे सुरू असायचे. त्याचे मेसेज पकडल्यानंतर तो आधी त्या मुलीनेच मेसेज केल्याचे सांगायचा. ती प्रत्येक वेळी त्याला माफ करायची. मात्र, काही वेळातच तो पुन्हा अगदी सामान्य वागू लागायचा. जणू काही घडलचं नाही.

या सगळ्या गोष्टी वारंवार घडल्यानंतर महवशने अखेर हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाते संपवताना तिच्या बॉयफ्रेंडने तिला एक वाक्य ऐकवलं. तो म्हणाला, 'तुला माझ्यासारखा मुलगा पुन्हा मिळणार नाही.'

महवशने सांगितलेला हा अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नात्यात विश्वास, प्रामाणिकपणा आणि एकमेकांचा आदर किती महत्त्वाचा असतो, यावरही या व्हिडिओच्या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT