पुढारी ऑनलाईन
अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबई फिल्म कंपनीने ६ व्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत.
या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.
आपल्या अभिनयाने दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी रितेश दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिलंय २० वर्षांपर्यंत कॅमेऱ्याच्या समोर राहिल्यानंतर पहिल्यांदा मागे जात आहे. आपल्या पुढील चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याआधी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागत आहे.
वेड पुढील वर्षी १२ ऑगस्ट रोजी रिलीज होईल. हा एक म्युझिक ड्रामा चित्रपट आहे. संगीत सैराट फेम अजय-अतुल देतील. या चित्रपटामध्ये जिया शंकर, जेनेलिया देशमुख आणि स्वत: रितेश असणार आहे.