Kantara Chapter 1 BO Collection  Instagram
मनोरंजन

Kantara Chapter 1 BO Collection - दिवाळीत चांदी! ऋषभ शेट्टीच्या कांताराची रेकॉर्डतोड कमाई; बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड

Rishabh Shetty Kantara Chapter 1 BO Collection: दिवाळीत चांदी! ऋषभ शेट्टीच्या कांताराची रेकॉर्डतोड कमाई; बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड

स्वालिया न. शिकलगार

‘कांतारा चॅप्टर १’ ने ७०० कोटींचा टप्पा पार केला असून ‘छावा’चा रेकॉर्ड मोडण्याच्या काही पावलांवर आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट दिवाळीतही बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड कायम ठेवत आहे.

Rishabh Shetty Kantara Chapter 1 BO Collection

मुंबई - ऋषभ शेट्टीचा चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ने दिन भी बॉक्स ऑफिसवर दमदार पकड बनवलीय. चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा आकडा पार केला आहे. आता असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट ‘छावा’चा रेकॉर्ड तोडण्यासाठी तयार आहे. ऋषभ शेट्टीचा पौराणिक चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ चे बॉक्स ऑफिसवर जादू कायम आङे. २१ व्या दिवशीही प्रेक्षक कांताराकडे वळले आहेत. २०२५ चा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘छावा’चे लाईफटाईम रेकॉर्ड तोडण्यासाठी काही पाऊले दूर असल्याचे म्हटले जात आहे.

२० व्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई

रिपोर्ट्सनुसार, ‘कांतारा चॅप्टर १’ने रिलीजच्या २० व्या दिवशी (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) सर्व भाषेत जवळपास ९.०९ कोटींचे कलेक्शन झाले आहे. भारतात एकूण नेट कमाई ५४४.२४ कोटी पर्यंत पोहोचले आहे. रात्री च्या शोज नंतर अंतिम आकड्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘छावा’चा रेकॉर्ड मोडणार कांतारा?

२०२५ च्या मेगा ब्लॉकबस्टर ‘छावा’ने आपल्या लाईफटाईम रनमध्ये भारतात ६०१.५४ कोटींची कमाई केली होती. ‘कांतारा चॅप्टर १’ चा हा रेकॉर्ड तोडण्यासाठी आता जवळपास ५० कोटी आणखी कमवावे लागतील. ज चित्रपटाच्या कमाईची गती कायम राहिली तर पुढच्या आठवड्या अखेरीस नवं माईलस्टोन निर्माण होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT