Subodh Bhave-Rinku Rajguru-Prarthna Behere new Marathi movie  Instagram
मनोरंजन

Marathi Movie | रिंकू राजगुरूचा लव्ह ट्रँगल; ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ घेऊन येताहेत सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे

Subodh Bhave-Rinku Rajguru-Prarthna Behere | सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे व रिंकू राजगुरूचा लव्ह ट्रँगल - ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’

स्वालिया न. शिकलगार

मुंबई - नात्यांमधल्या गोंधळावर आधारित हटके प्रेमकहाणी 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हास्याने भरलेली, नात्यांमधील गोंधळ आणि गैरसमज यावर भाष्य करणारी एक भन्नाट प्रेमकहाणी तीन कलाकारांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत तसेच रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरनंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू दिसणार आहेत. सोबतच जोडीला असणार आहे अनिकेत विश्वासराव. पण, हे कलाकार कोणती भूमिका साकारणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. चित्रपटाची कहाणी काय असेल, याकडेही सिनेप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. या चौकट कलाकारांची धमाल केमिस्ट्री प्रेक्षकांना किती आवडते, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल. २२ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, ''मराठी प्रेक्षकांसाठी एक हटके संकल्पना असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. ज्यामध्ये नात्यांमधल्या चढ-उताराची गोष्ट हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल.''

निर्माते रजत अग्रवाल म्हणाले, ''प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळा व मजेशीर आशय असलेला चित्रपट घेऊन येत आहोत. सुबोध भावे, रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहेरे यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणं, हा अत्यंत खास अनुभव होता.'' या चित्रपटाला साजन पटेल, अमेय नरे यांचे संगीत लाभले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT