रीचा चढ्ढा pudhari
मनोरंजन

Richa Chadha: मी भारतात राहते, बंदूक खरेदी करावी लागेल; लेकीच्या जन्मानंतर रीचा चढ्ढाला वाटली होती ही भीती

अली फजलशी लग्न करून एका मुलीची आई झालेली रीचा मुलीच्या जन्मापूर्वी प्रचंड घाबरली होती

अमृता चौगुले

aअनेक सिनेमांमधून स्वतच्या अभिनयाची खास छाप सोडलेली अभिनेत्री म्हणजे रीचा चढ्ढा. तिच्या वेगळ्या भूमिकांच्या निवडीमुळे ती कायमच लक्षात राहते. पण सध्या रीचा चर्चेत आहे ते तिच्या नव्या विधानामुळे. अली फजलशी लग्न करून एका मुलीची आई झालेली रीचा मुलीच्या जन्मापूर्वी प्रचंड घाबरली होती. जेव्हा तिला समजले की आता आई होणार आहे तिला याचे दडपण आले होते. बाळाच्या सुरक्षिततेची तिला अत्यंत काळजी वाटत होती.

‘आपण भारतात राहतो तर सुरक्षिततेसाठी बंदूक खरेदी करायला हवी' असे तिला सतत वाटत असायचे.

एका मुलाखतीदरम्यान तिने हा अनुभव शेयर केला आहे. यामध्ये पुढे ती म्हणते की, मला जेव्हा समजले की मी आई होणार आह. मला या सगळ्यांचे खूप टेंशन आले. मी खरेतर घाबरले होते. मी असा विचार करत होते की वातावरणात बदल होत आहेत. लोक मारले जात आहेत. जगात बऱ्याच वाईट गोष्टी घडत असताना मूल जन्माला घालणे कितपत योग्य आहे. असे मला सतत वाटायचे.

आयुष्य संपल्यासारखे वाटायचे

रीचा म्हणते एका क्षणाला डिलिव्हरीनंतर स्वतंत्र होणे अवघड असते. तुमच्यावर एक जीव अवलंबून असतो. सुरुवातीचे सहा महीने तरी बाळाचे पोट भरणे ही मोठी जबाबदारी असते. आई होणार हे समजल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया भीती हीच होती. मला वाटत अरे देवा माझे आयुष्य संपले आहे का?

बंदूक असणे महत्त्वाचे वाटत होते

रिचा पुढे सांगते, 'गरोदर असताना मी खूप जास्त अलर्ट झाले होते. खासकरून तेव्हा जेव्हा मला समजले की मी आई होणार आहे. मी विचार केला आपण भारतात राहतो. मला आता बंदूक खरेदीक करायला हवी. पण मग मी परत विचार केला की नाही त्यावेळी बघू काय होते. आपण मुलीला आपल्यासारखे मजबूत बनवू.’

या मुलाखतीमध्ये तिने महिलांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण केले आहेत. रीचाच्या या स्टेटमेंटवर नेटीझन्स संमिश्र कमेंट्स करत आहेत. काहीजण इतके स्पष्ट बोलल्याबाबत तिचे कौतुक करत आहेत तर एकाने तिला 'देशाला बदनाम करण्यासाठी चीनकडून किती पैसे मिळाले अशी कमेंट केली आहे. रीचा अलीकडेच हिरामंडी सिनेमात दिसली होती

रीचा आणि अली फजल मागील वर्षीच एका मुलीचे आई बाबा बनले आहेत. जूनैरा असे त्यांनी आपल्या लेकीचे नाव ठेवले आहे. अलीकडेच त्यांनी जूनैराचा पहिला वाढदिवसही साजरा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT