मनोरंजन

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीला परदेशी जाण्यास परवानगी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने २७ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान तिला परदेश प्रवासासाठी परवानगी दिली. (Rhea Chakraborty) सीबीआयने लूकआऊट नोटीस बजावल्यामुळे रियाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ही याचिका प्रलंबित असल्याने नोटिसीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला आहे. त्यावर खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Rhea Chakraborty)

संबंधित बातम्या –

SCROLL FOR NEXT